शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कंटेनरमध्ये राहणाऱ्यांना मार्चअखेर घराचा ताबा, तळिये दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम प्रगतिपथावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 9:37 AM

Home News: दरडग्रस्त तळिये गावाचे पुनर्वसनाचे काम सुरू असून म्हाडाच्या पथकाने या कामांची पाहणी करून आढावा घेतला. २०० घरांपैकी १७० घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले असून ९० घरांच्या फुटिंगचे काम झाले आहे.

महाड : दरडग्रस्त तळिये गावाचे पुनर्वसनाचे काम सुरू असून म्हाडाच्या पथकाने या कामांची पाहणी करून आढावा घेतला. २०० घरांपैकी १७० घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले असून ९० घरांच्या फुटिंगचे काम झाले आहे. ३२ घरांचे स्ट्रक्चर उभारण्यात आले आहे. सध्या कंटेनरमध्ये राहत असलेल्या २५ कुटुंबीयांना मार्चअखेर नवीन घराचा ताबा देण्याचा प्रयत्न असेल तर २०० घरांचे बांधकाम एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन  म्हाडाचे कार्यकारी अभियंता धीरज जैन यांनी दिले आहे. 

तालुक्यातील तळिये गावावर २२ व २३ जुलै २०२१ च्या अतिवृष्टीमध्ये दरड कोसळून ६६ घरे गाडली गेली होती. त्यात ८७ जणांचा मृत्यू झाला होता. दरडग्रस्त तळिये गावाच्या पुनर्वसनात घरे बांधून देण्याचे काम म्हाडाने अर्थातच कोकण गृह निर्माण व क्षेत्र विकास महामंडळाने घेतले आहे, तर पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाने जिल्हा परिषदेकडे आहे.

तळिये गावाच्या पुनर्वसनासाठी शासनामार्फत १७.६४ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. संपादित केलेल्या जागेमध्ये २३१ घरकुल बनवण्याचे काम ऑगस्ट २०२१ पासून म्हाडाने हाती घेतले. यासाठी ट्रान्सकॉन डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कामाची कार्यादेश देण्यात आला आहे. उर्वरित ३० घरकुलांसाठी शासनामार्फत जागेचा शोध सुरू असून जागा संपादित केल्यानंतर ही घरकुलेही म्हाडामार्फत बांधली जाणार आहेत.

तळिये येथे म्हाडामार्फत बांधण्यात येणाऱ्या घरकुलाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी म्हाडाचे कार्यकारी अभियंता धीरज जैन, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, सहायक अभियंता राज अर्नालिका, जनसंपर्क अधिकारी हेमंत पाटील यांनी दौरा केला.

- नव्याने बांधण्यात येणारे घरकुल हे ६०० चौरस फुटांचे असून यामध्ये दोन बेडरूम, एक हॉल, किचन, संडास बाथरूम व चारही बाजूंनी ४ फूट पडवी, असे स्वरूप असणार आहे. - एका घरकुलांसाठी २० लाखांचे बजेट असून संपूर्ण प्रोजेक्टसाठी ७७ कोटींची प्रशासकीय मान्यता आहे. आयआयटी पवईकडून घरकुलाचे स्ट्रक्चर व त्यांचे मजबुतीकरण प्रमाणित करण्यात आले आहे. - ग्रामीण भागातील जनतेला मॉडर्न लाइफ देण्याचा प्रयत्न या घरकुलातून करण्यात आला आहे.  घरकुलाच्या मेंटेनन्सची ५ वर्षे जबाबदारी संबंधित ठेकेदाराने घ्यायची आहे. कमीत कमी ५० वर्षे टिकेल असे हे वॉटर व फायर प्रूफ बांधकाम आहे, असे जैन यांनी सांगितले.

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनRaigadरायगड