पाली : सुधागड तालुक्यातील आडूळसे ग्रामपंचायत हद्दीत येणा-या तसेच गावठी दारूचे माहेरघर समजले जाणाºया शरदवाडी व गौळमाल ठाकूरवाडी येथील गावठी दारूबंदीसाठी ग्रामस्थांसह महिलांनी कंबर कसली आहे. दारूबंदी केल्याशिवाय शांत बसणार नाही असा पक्का निर्धार त्यांनी केला आहे .दारूबंदीसाठी आडूळसे ग्रामपंचायतीचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शरद फोंडे यांच्या प्रयत्नातून नुकतीच शरदवाडी येथे पोलीस, वनविभाग व ग्रामस्थ अशी संयुक्त बैठक घेण्यात आली होती. यावेळी पाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण चव्हाण, पोलीस नाईक मनोहर पाटील, वनपाल आर.व्ही. नागोठकर, आडूळसे सरपंच भाऊ कोकरे, सदस्य तानाजी बांगारे आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीत तंटामुक्त अध्यक्ष शरद फोंडे यांनी माहिती देताना सांगितले की, २००८ साली याच वाडीवरती खूप मोठे स्पिरीट कांड झाले होते. त्यामध्ये २६ आदिवासी बांधवांचे बळी गेले असताना देखील येथील गावठी दारूचे धंदे आजही राजरोसपणे सुरूच आहेत. याविरोधात ग्रामस्थांनी अनेकदा पाली पोलीस ठाणे, दारू उत्पादन शुल्क विभाग अलिबाग यांना तक्र ारी अर्ज देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप फोंडे यांनी केला. तसेच या दोन वाड्यांवरूनच संपूर्ण सुधागड तालुक्याला गावठी दारू पुरविली जाते, असेही त्यांनी सांगितले. सरपंच कोकरे यांनी या दारूधंद्यामुळे आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील अनेक पुरु ष व महिला यांच्यासह तरुण देखील व्यसनाधीन होऊन त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पालीचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी या वाड्यावर अनेकदा व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करून देखील काहीही फरक पडलेला नसल्याचे सरपंचांनी सांगितले.पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी यापुढे या दोन्हीही वाड्यावरती चालणारे गावठी दारूचे धंदे व दारू तयार करण्यात येणाºया हातभट्ट्या जंगलभागात कुठेही असतील तेथे आम्ही व वनविभागाचे अधिकारी जाऊन त्या उद्ध्वस्त करू व दारू तयार करणाºयांवर कायदेशीर खटले भरण्यात येतील. गावठी दारू तयार करण्याचे काम हे सर्रासपणे घनदाट जंगलभागातून होत असल्याने अनेकदा त्याभागातील जंगलांना वणवे लागतात. खूप मोठ्या प्रमाणात वनसंपदेचा ºहास होत आहे त्यामुळे हे धंदे कायमस्वरूपी बंद करण्याचे काम वनविभागाकडून देखील आम्ही सुरु केले आहे, असे वनपाल नागोठणेकर यांनी सांगितले.
शरदवाडी, गौळमाल ठाकूरवाडीतील ग्रामस्थांनी के ला दारूबंदीचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 2:30 AM