समुद्रातील सुरक्षेची जबाबदारी ही तटरक्षक दलाची, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:28 AM2019-11-16T00:28:46+5:302019-11-16T00:28:50+5:30

समुद्रातील सुरक्षेची जबाबदारी ही तटरक्षक दलाचीच आहे, असे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

The responsibility of the protection of the sea is explained by the Coast Guard, the Collector | समुद्रातील सुरक्षेची जबाबदारी ही तटरक्षक दलाची, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

समुद्रातील सुरक्षेची जबाबदारी ही तटरक्षक दलाची, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

Next

आविष्कार देसाई
अलिबाग : समुद्रातील सुरक्षेची जबाबदारी ही तटरक्षक दलाचीच आहे, असे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गुरुवारी खोल समुद्रामध्ये एलईडी मासेमारी करणारे आणि ट्रेलरच्या माध्यमातून मासेमारी करणाºया दोन गटांमध्ये संघर्ष झाला होता. त्यामुळे कायदा आणि सुव्यस्थेबरोबरच प्रामुख्याने सुरक्षेचा प्रश्नही त्यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी एलईडीच्या माध्यमातून मासेमारी करणाºया तीन बोटमालकांवर कारवाई करण्यात येऊन त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.
गुरुवारी भरसमुद्रात दोन मासेमारी करणाºया गटांमध्ये उफाळून आलेल्या संघर्षामध्ये काही मासेमारी करणारे जखमी झाले आहेत. पैकी एकाला अलिबाग येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गुरुवारी झालेल्या या घटनेने सर्वच यंत्रणांना खडबडून जागे केले आहे. स्थानिक पातळीवर उफाळून आलेला संघर्ष एवढेच या घटनेचे गांभीर्य नाही, तर परराज्यातील अथवा परदेशातील मासेमारी करणाऱ्यांमध्ये असा संघर्ष झाला असता किंवा त्यांच्या आडून अन्य कोणी काही घातपात केला असता तर हे प्रकरण नक्की कोणी आणि कसे हातळले असते, असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहे.
बोडणी येथील मासेमारी बोटीतील खलाशी हे आपल्यावर हल्ला होणार या भीतीने गार झाले होते. त्यांनी अख्खी रात्र ही बोटीतच घालवली. सकाळी ९ वाजता ते आपल्या घरी पोहोचले. दरम्यानच्या कालावधीत त्यांनी मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासकीय मदत पोहोचलीच नाही, तसेच सोबतच्या बोटीही त्यांच्या जवळ काही वेळाने पोहोचल्या. त्यामुळे त्यातील भरत कोळी यांच्यासह त्यांच्या सहकाºयांना मारहाण झाली होती.
सदरची घटना ही १२ नॉटिकल माइल्सच्या पुढे घडलेली असल्याने रायगड पोलिसांनी आधीच हात वर करत हे प्रकरण यलोगेट पोलिसांच्या मैदानात टोलवले होते; परंतु त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तक्रार घेण्याची तयारी दर्शवली. मात्र, दोन गटांमध्ये समेट होण्याच्या शक्यतेने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. समुद्रातील सुरक्षेची जबाबदारी ही तटरक्षक दलाची आहे. हा स्थानिकांमधील वाद असल्याने कदाचित त्यांनी तसे सांगितले असेल, असे जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. मी गुरुवारी रात्री त्यांना घटनेचे गांभीर्य सांगितले. त्यानंतर त्यांनी बोटींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. नौदलाच्या हेलिकॉप्टरमधूनही तपास करण्याची तयारी त्यांनी दाखवल्याकडे सूर्यवंशी यांनी लक्ष वेधले.
>अशा कारवाई हाणून पाडू - अरु ण कु मार
भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट अरुण कुमार यांच्याशी संपर्क साधला असता याबाबतची जबाबदारी ही मत्स्यव्यवसाय अधिकारी यांची आहे, असे त्यांनी सांगितले. सुरक्षेच्या बाबतीमध्ये अन्य काही घडले असते तर त्या सुरक्षेची जबाबदारी निश्चितपणे आमचीच आहे; परंतु तसे काहीच घडू देणार नाही, अशा कारवाई हाणून पाडण्यात तटरक्षक दल सक्षम आहे, असेही अरुण कुमार यांनी स्पष्ट केले.आम्हाला माहिती मिळाली होती; परंतु मासेमारी करणाºयांना माघारी बोलावले आहे. त्यांची तक्रार घेण्यात येणार आहे, असे रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी आम्हाला कळवले होते.

Web Title: The responsibility of the protection of the sea is explained by the Coast Guard, the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.