शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

परिचारिकांच्या रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 1:57 AM

१२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभरात पाळला जातो. १८५४ मध्ये झालेल्या दुसऱ्या महायुद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत त्यांची शुश्रूषा करीत हिंडणारी आद्य परिचारिका

जयंत धुळप अलिबाग : १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभरात पाळला जातो. १८५४ मध्ये झालेल्या दुसऱ्या महायुद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत त्यांची शुश्रूषा करीत हिंडणारी आद्य परिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांना आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या संस्थापिका मानले जाते. त्यांनी परिचारिका आणि रुग्णसेवा या नात्याची निर्मिती आपल्या कृतीतून केली आहे. परंतु आरोग्य विभागाच्या निर्णयांमुळे सरकारी आरोग्य सेवेतील परिचारिकांच्या रिक्त पदांमुळे परिचारिका आणि रुग्णसेवा नात्यातच खंड पडत असल्याचे दिसून येत आहे.अलिबाग शहरातील रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयात परिचारिकांची ९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५७ पदे भरली असून ३८ परिचारिकांची पदे रिक्त आहेत. परिचारिकांच्या रिक्त पदांमुळे रुग्ण सेवेवर होणारा विपरीत परिणाम कमी करण्याकरिता २२ परिचारिकांची करारावर नियुक्ती करून ३८ रिक्त पदांची संख्या तात्पुरती १६ वर आणण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी दिली आहे. दरम्यान, माणगाव, पेण, पनवेल, महाड येथे असलेल्या उप जिल्हा रुग्णालयातही देखील परिचारिकांची पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेत खंड पडत आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेंतर्गत जिल्ह्यात एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २८८ आरोग्य उप केंद्रे कार्यरत आहेत. या एकूण ३४० आरोग्य सेवा केंद्रांकरिता मुळातच ६२ परिचारिकांची पदे शासनाने मंजूर केली आहेत आणि त्यापैकी ५९ भरली आहेत. तीन परिचारिकांची पदे रिक्त आहेत. परिचारिकांची पदे वाढविण्याऐवजी शासनाने ‘आरोग्य सेविका’ ही संकल्पना अमलात आणली आहे. जिल्ह्यात आरोग्य सेविकांची ५२४ पदे शासनाने मंजूर केली आहेत. त्यापैकी ३२३ पदे भरली आहेत तर तब्बल २०१ आरोग्य सेविकांची पदे रिक्त असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.