- जयंत धुळप, अलिबागगेल्या महिनाभरात रायगड जिल्ह्यात पाली व रोहा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या विविध तीन चोऱ्या व दरोड्यांच्या गुन्ह्यांचा तपास केला. दरोड्यांतील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या एकूण रकमेपैकी तब्बल १ कोटी ४१ लाख ४१ हजार ३५० रुपये परत मिळविण्यात यशस्वी झालेल्या रायगड पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी शनिवारी केला.पालीत दीड लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेणाऱ्या चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून १ लाख २२ हजार ६५0 रुपयांची रोकड परत मिळवण्यात यश मिळवल्याप्रकरणी उप निरीक्षक धनंजय तेलगोटे यांचा सत्कार करण्यात आला.रोह्यात लंपास केलेल्या २५ लाख ६ हजार ७0 रुपयांच्या दाखल गुन्ह्याप्रकरणी आरोपींना अटक करून त्याच्याकडून २४ लाख ८४ हजार २00 रुपयांची रोकड परत मिळवण्यात यश मिळविणारे रोहा उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे, पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, पोसई डी. डी. कदम, के.एस. नागे, पोलीस हवालदार एस.के. शिंदे आणि एन.एस. पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
दरोड्यातील एक कोटी ४१ लाख मिळवले परत
By admin | Published: April 10, 2016 1:09 AM