रेवस-करंजा बोटसेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:45 AM2019-06-13T01:45:02+5:302019-06-13T01:45:23+5:30
जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा : समुद्रात सहा मीटर उंचीच्या लाटांची शक्यता; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
अलिबाग : अरबी समुद्रात चक्रिवादळाची निर्मिती झाल्याने बुधवार व गुरुवारी सहा मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली असून कोकण किनारपट्टीतील पालघर, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे व रत्नागिरी समुद्रकिनाऱ्यावरील मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देखील जिल्हा प्रशासनांना देण्यात आले. या पार्श्वभूमीवर किनारी भागातील सर्व गावांत सतर्कतेचा इशारा देऊन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.
वादळाच्या इशाºयाच्या पार्श्वभूमीवर, रेवस बंदरावर धोका दर्शविणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला होता. रेवस येथे मोठ्या लाटादेखील अनुभवास आल्या. परिणामी, अलिबाग तालुक्यातील रेवस आणि उरण तालुक्यातील करंजा या दरम्यान पावसाळ््यातही चालू असणारी प्रवासी बोट सेवा बुधवारी सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली होती. परिणामी, या प्रवासी सागरी मार्गाने उरण, पनवेल येथे दररोज नोकरीकरिता ये-जा करणारे व अन्य प्रवासी यांची मोठी गैरसोय झाली. या सर्व प्रवाशांना अलिबाग-पेण-पनवेल असा प्रवास करून उरण व मुंबईत पोहोचावे लागले.
२४ तासांत मोठ्या पावसाची शक्यता
च्रायगड जिल्ह्यात येत्या २४ तासांत मोठ्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज
हवामान खात्याने वर्तविला असून त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील संबंधित सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.