आढावा बैठकीत पालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 04:56 AM2018-10-06T04:56:13+5:302018-10-06T04:56:49+5:30
दिरंगाईबाबत पालकमंत्र्यांनी भरला सज्जड दम : अचानक बैठक; अधिकाºयांची तारांबळ
आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यात विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, ती कामे होत आहेत की नाही, त्यांची सध्या काय स्थिती आहे याची माहिती घेण्यासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी अचानक आढावा बैठक बोलावली. त्यामुळे सर्व अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडाली. आढावा घेताना अधिकाºयांच्या गोल-गोल उत्तरावर पालकमंत्र्यांनी अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढून कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम त्यांनी भरला.
अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आढावा बैठकीमध्ये विविध योजनांवर सखोल चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने मानकुळे आणि रेवस पाणीपुरवठ्याच्या कामाबाबत पदाधिकाºयांच्या बºयाच तक्र ारी आल्या होत्या. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी वैगुर्लेकर यांनी गोल-गोल उत्तर देण्यास सुरु वात केली. त्यावेळी पालक मंत्र्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेत पाण्याच्या प्रश्नाबाबत कोणतीही सबब चालणार नाही, असे अधिकाºयांना खडसावले. पाणीपुरवठ्याच्या किती योजना सुरू आहेत याचा साधा आकडाही त्यांच्याकडे नसल्याने बैठकीमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम १ जानेवारी २0१९ पर्यंत पूर्ण करण्यात यावे असे आदेश पालक मंत्र्यांनी अधिकाºयांना दिले.
जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न या बैठकीत सर्वांनीच उचलून धरला. मात्र, जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे असमाधानकारक काम झाल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रश्नावर बांधकाम अधिकारीही समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत.
कोलाड-नागोठणे असा मार्ग असतानाही अलिबाग तालुक्यातील नागाव-रायवाडी या मार्गावरून अवजड वाहतूक करण्यात येत आहे. या मार्गावरून जाणारी अवजड वाहतूक बंद करावी अशी लेखी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर यांनी बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र, याकडे अधिकाºयांनी लक्ष दिले नाही. अवजड वाहतूक बंद करण्याची पुन्हा मागणी करण्यात आली.
अलिबाग तालुक्यातील शिरवली-माणकुळे या रस्त्याचे काम गेले कित्येक दिवस अपूर्ण आहे. या कामाची गती वाढविण्यासाठी दर १५ दिवसांनी शिरवली-माणकुळे या रस्त्याच्या कामांचा अहवाल पाठविण्याचे आदेशही पालक मंत्र्यांनी बांधकाम अधिकाºयांना दिले.
नुकसानी पंचनामे तातडीने करा
च्आठवडाभरापूर्वी झालेल्या वादळामुळे अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामे तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी दिले. कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा सज्जड दमच त्यांनी अधिकाºयांना भरला.
च्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर,जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार यांच्यासह प्रत्येक विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
अधिकाºयांनी दिली खोटी माहिती
च्अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या सोलार सिस्टीमवर उभारलेली पत्र्याची शेड काढावी, अशी मागणीही करण्यात आली. मात्र, अशी कोणतीच शेड अस्तित्वात नसल्याचे दिशाभूल करणारे उत्तर बांधकाम अधिकाºयांनी दिले. त्यामुळे खोटी माहिती देणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
च्जिल्हास्तरावर होणाºया विविध शासकीय बैठकांमध्ये ज्या समस्या चर्चेसाठी येतात त्यावेळी संबंधित शासकीय अधिकारी केवळ, बैठकीतील उत्तरे देत असतात. त्यावेळी होणाºया कार्यवाहीच्या आदेशांची पूर्तता झाली किंवा नाही याबाबत जनसामान्यांना माहिती होत नाही. अशीच परिस्थिती शुक्रवारी अचानक झालेल्या आढावा बैठकीत थेट पालकमंत्री चव्हाण यांनाच अनुभवास आल्याने त्यांनी सक्त आदेशांची सरबत्तीच केली.