रेवदंड्याच्या सिनेगॉगला १७५ वर्षे पूर्ण 

By अोंकार करंबेळकर | Published: November 18, 2017 09:18 AM2017-11-18T09:18:15+5:302017-11-18T09:19:36+5:30

मुंबई, ठाणे, पुणे, अलिबाग आणि रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग यामध्ये बेने इस्रायली समुदाय आजही राहतो. या सर्व गावांमध्ये त्यांनी प्रार्थनास्थळे बांधली होती. रायगड जिल्ह्यातले जुने असे एक सिनेगॉग म्हणजे रेवदंडा गावातील सिनेगॉग. त्याला यावर्षी १७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

The Revolutionary Synagogue completed 175 years | रेवदंड्याच्या सिनेगॉगला १७५ वर्षे पूर्ण 

रेवदंड्याच्या सिनेगॉगला १७५ वर्षे पूर्ण 

googlenewsNext
ठळक मुद्देरायगड जिल्ह्यातले जुने असे एक सिनेगॉग म्हणजे रेवदंडा गावातील सिनेगॉगत्याला यावर्षी १७५ वर्षे पूर्ण होत आहेतरेवदंड्याचे हे सिनेगॉग १८४२ साली बांधायला घेतले. त्याचे काम सहा वर्षे चालले आणि त्याचा वापर प्रार्थनेसाठी सुरु झाला

मुंबई - इस्रायलमधून आलेल्या ज्यूं बांधवांच्या नौका कोकणात नौगावला लागल्या आणि भारत व ज्यू यांचं एक नवं नातं निर्माण झालं. तिकडे कोचीनलाही काही ज्यू नौकेतून येऊन थडकले. कोकणातल्या ज्यूं ना इथल्या लोकांनी आपलंसं केलं त्यांना ते बेने इस्रायली म्हणजे इस्रायलची लेकरे असं म्हणू लागले. मुंबई, ठाणे, पुणे, अलिबाग आणि रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग यामध्ये बेने इस्रायली समुदाय आजही राहतो. या सर्व गावांमध्ये त्यांनी प्रार्थनास्थळे बांधली होती. रायगड जिल्ह्यातले जुने असे एक सिनेगॉग म्हणजे रेवदंडा गावातील सिनेगॉग. त्याला यावर्षी १७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

रेवदंड्याचे हे सिनेगॉग १८४२ साली बांधायला घेतले. त्याचे काम सहा वर्षे चालले आणि त्याचा वापर प्रार्थनेसाठी सुरु झाला. प्रत्येक सिनेगॉगला नाव असते त्याप्रमाणे या सिनेगॉगलाही नाव देण्यात आले आहे. इस्रायली बांधव याला 'बेथ एल' म्हणजे देवाचे घर म्हणून ओळखतात. १८७६ साली त्याची पहिली दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. सोलोमन शालेम शूराबी हे त्याचे पहिले हजान म्हणजे प्रार्थना सांगणारे, ग्रंथ वाचणारे एक प्रसिद्ध गृहस्थ होते. कोचीनमधील ज्यूंशी संपर्क असल्याने त्यांना कोचीकर असेही म्हटले जाई. शूराबी यांनी अलिबागच्या सिनेगॉगलाही आर्थिक मदत केली होती. 

आज रेवदंडा गावात फार थोड्या संख्येने बेने इस्रायली समुदाय राहातो. एकेकाळी मोठ्या संख्येने व्यापारात आणि नोकर्यांमध्ये बेने इस्रायली लोक कार्यरत होते, आज मात्र स्थलांतरामुळे त्यांची संख्या कमी राहिली आहे. रेवदंडा बाजारपेठेपासून अगदी थोड्या अंतरावर असणार्या या सिनेगॉगला अलिबागला जाणार्या पर्यटकांनी नक्की भेट द्यावी .

अलिबागजवळचा घोडकातळ तुम्हाला माहिती आहे का ?


अलिबागजवळच काही किलोमीटर अंतरावर सागाव मारुती, तळवली नावाच्या गावात घोडकातळ नावाचा एक प्रसिद्ध खडक आहे. हिंदू आणि बेने इस्रायली त्यास पवित्र मानतात. बेने इस्रायलींच्या श्रद्धेनुसार या कातळावर त्यांच्या 'एलियाहू हन्नाबी या देवाच्या रथाचे चाक आणि त्याच्या घोड्यांच्या टापा उमटल्या आहेत. ख्रिस्तपूर्व १७५ मध्ये जेव्हा पहिला बेने इस्रायली भारतात आला तेव्हा 'एलियाहू हन्नाबी'ने त्याला वाचवले होते असे ज्यू लोक मानतात. तसेच त्यानंतर सन १००० मध्ये तो पुन्हा प्रकट झाला आणि ज्यू लोकांनो आपल्याला आपली जेरुसलेमची पवित्र भूमी पुन्हा मिळणार आहे तुम्ही निराश होऊ नका असे सांगून अंतर्धान पावला. त्यावेळेस त्याच्या घोड्याच्या चाकाचे चिन्ह येथे उमटले असे बेने इस्रायली समजतात. आजही इस्रायलमधून भारतात आल्यावर ज्यू बांधव तेथे जाऊन त्याची पूजा करतात

Web Title: The Revolutionary Synagogue completed 175 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.