शिक्षकांनी घोषित केलेले बक्षिस आजही स्मरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:37 AM2019-09-05T02:37:09+5:302019-09-05T02:37:20+5:30
स्पर्धात्मक परीक्षेतील यशााची गुरूकिल्ली मिळाली, पनवेल प्रादेशिक परिवहन विभागात उपप्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत
पनवेल : राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागात पहिल्या बॅचच्या महिला अधिकारी हेमांगीणी पाटील या सध्या पनवेल प्रादेशिक परिवहन विभागात उपप्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत . माळेगाव सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन पाटील या जिद्दीच्या जोरावर आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर रु जू झाल्या आहेत . या संपूर्ण प्रवासात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे हेमागिंणी सांगतात.
हेमागिंणी पाटील यांनी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील अविस्मरणीय आठवणीना उजाळा दिला. मालेगाव येथील रेणुका भाऊसाहेब हिरे (आरबीएच) या कन्याशाळेत शिकत असताना गणित विषय शिकविणारे आमचे शिक्षक दिनेश पवार हे आम्हाला नेहमीच प्रोत्साहन द्यायचे. आम्ही दहावीत असताना पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी १५0 रूपये बक्षिस देण्याचे जाहिर केले होते. बक्षिसाची रकम फार मोठी नसली तरी ती प्रत्यक्ष सरांनी जाहिर केल्याने आमच्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ती मौलवान होती. त्यामुळे हे मीच मिळविणार असा चंग मी बांधला. त्यानुसार कसून अभ्यास केला. अखेर दहावीच्या परीक्षेत गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवून हे बक्षिस मी पटकाविले. या प्रसंगाने माझ्यात वेगळी जिद्द निर्माण झाली. कोणतेही आवाहन अशक्य नसते, याचा मला बोध झाला.
कुटुंबियांसह शिक्षकांचे योगदान मोठे
महाविद्यालयीन शिक्षणानंतर एमपीएसीसीची परीक्षा देताना मला त्याचा फायदा झाला. त्यामुळेच माझ्या जडणघडणीत कुटुंबासह शिक्षकांचाही मोठा वाटा असल्याचे हेमागिंणी पाटील सांगतात. प्रादेशिक परिवहन विभागात कार्यरत असताना ठाणे विभागाची चोख जबाबदारी पार पाडली.
सध्याच्या घडीला पनवेल प्रादेशिक परिवहन विभागात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून त्या काम करीत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना अबोली रिक्षाचे परिमट वाटप करण्याचे धोरण राज्य सरकारने जाहिर केले. या धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी हेमांगिणी पाटील यांचे योगदान मोठे आहे . एमएमआरडीए विभागात तब्बल १३00 पेक्षा जास्त महिलांना अबोली रिक्षाचे परिमट वाटप करण्याची यशस्वी कामगिरी केली आहे.
जुन्या वाहनांच्या लिलावात महत्वाचे योगदान
पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करून ७0 लाखांचा महसूल वसूल केला आहे. आपल्या जडणघडणीत आपल्या कुटुंबासह शिक्षकांचा वाटा मोठा असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.