परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 12:00 AM2019-10-26T00:00:07+5:302019-10-26T00:00:23+5:30
शेतकरी हवालदिल; खारअंबोलीत पंचनामे करण्याची मागणी
आगरदांडा : मुरुड तालुक्यातील खारअंबोली परिसरातील परतीच्या पावसामुळे कापलेल्या भातशेतीला अंकुर आल्याने शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मुरुडमध्ये कृषी विभगात अनेक शेतकºयांनी पंचनामे करा, अशी मागणी करूनसुद्धा शासन लक्ष देत नसल्याने शेकडो शेतकºयांना एकत्र करून मोठा मोर्चा काढण्याचा इशारा खारअंबोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोज कमाने यांनी दिला आहे.
खारअंबोली परिसरातील जोसरंजन, उंडरगाव, खतिबखार या परिसरात भाताची कापणी होऊन भाताला पाण्यात भिजल्याने मोड येऊन रोपे तयार झाली आहेत. आता भात कापणी हंगाम सुरू होत असताना पावसाचे संकट पुन्हा समोर ठाकल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मुरुड तालुक्यात मागील आठवड्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसा कडकडीत ऊन आणि सायंकाळी अचानक आभाळ भरून येऊन जोरदार वाºयासह पावसाच्या सरी कोसळत आहेत.
विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे परतीच्या या पावसाचा भातशेतीवर मात्र प्रतिकूल परिणाम झाला आहे. कापणीयोग्य पीक शेतात आडवे झाल्याने शेतकºयाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात कुषी अधिकारी व तहसीलदार यांना शेतकºयांनी माहिती देऊनसुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. आजतागात कोणत्याही अधिकाºयाने या भागाला भेट न दिल्याने अंबोली परिसरातील शेतकरी रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनोज कमाने यांनी दिला आहे.