श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:51 AM2021-04-23T00:51:56+5:302021-04-23T00:53:16+5:30

बाधितांचा मृत्युदर ५ टक्के : पोलिसांकडून दंडात्मक कारवाई; अतिरिक्त पोलीस दल दाखल

Rising graph of corona in Shrivardhan taluka | श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख

श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख

Next



संतोष सापते
लोकमत न्यूज नेटवर्क 
श्रीवर्धन : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या स्वरूपात वाढलेला दिसून येत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी असलेली बेडची संख्या जवळपास पूर्ण झालेली आहे. उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी जवळपास ४० बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आजमितीस तालुक्यात सध्या उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या ८८ आहे. मात्र, त्यापैकी ४८ व्यक्तींना त्रास होत नसल्याने स्वगृही उपचार घेत आहेत.
ऑक्सिजन पुरवठा मुबलक स्वरूपात उपलब्ध आहे. मात्र, रुग्णसंख्यावाढीचा वेग या स्वरूपात राहिल्यास रुग्णांसाठी बेडची समस्या निश्चितच निर्माण होणार आहे. त्या कारणास्तव जनतेने आपल्या नैतिक कर्तव्या ला जागून योग्य खबरदारी घेणे अगत्याचे आहे. जनतेने कोरोना हा विषय गांभीर्याने घेणे आजमितीस अगत्याचे झाले आहे. तालुका प्रशासन आणि पोलीस दल कसोशीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत जनतेला कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगत आहेत. मात्र, मला काही होत नाही.   अशा निरर्थक विचारांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. गुरुवारी श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी नागरिकांना आवाहन करत असताना दिसून आले. श्रीवर्धन पोलीस ठाणे व दिघी सागरी पोलीस ठाणे यांनी लॉकडाऊन कालावधीमध्ये कायद्याचा भंग करणाऱ्या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई ली आहे. तालुक्‍यात एकूण ४२ हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. शहरात पोलीस दलाच्या मदतीसाठी अतिरिक्त पोलीस दलाची ३० कर्मचाऱ्यांची तुकडी गुरुवारी हजर झाली आहे.

तालुक्यातील बाधितांचा आकडा ६३३ च्या जवळ
तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६३३ च्या जवळ पोहोचला. उपचार घेऊन ५१२ व्यक्ती स्वगृही परतल्या आहेत, मात्र २६ कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमवावा लागलेला आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर ढवळे, डॉ.अभिजित कुलकर्णी सर्वतोपरी सेवा पुरविण्याचा प्रयत्न करत आहेत.

कायद्याचा भंग करणाऱ्यांविरोधात आम्ही दंडात्मक स्वरूपाची कारवाई केलेली आहे. लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन होणे गरजेचे आहे.
-प्रमोद बाबर, 
पोलीस निरीक्षक श्रीवर्धन

जनतेने विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. कायद्याचा भंग करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. 
         - संदीप पोमन, सहायक पोलीस       
     निरीक्षक दिघी, सागरी पोलीस ठाणे

श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या अनुषंगाने तालुका प्रशासनाने योग्य ती सर्व खबरदारी घेतलेली आहे. जनतेने सहकार्य करावे, ही विनंती.
-सचिन गोसावी, तहसीलदार

Web Title: Rising graph of corona in Shrivardhan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.