शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:51 AM

बाधितांचा मृत्युदर ५ टक्के : पोलिसांकडून दंडात्मक कारवाई; अतिरिक्त पोलीस दल दाखल

संतोष सापतेलोकमत न्यूज नेटवर्क श्रीवर्धन : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या स्वरूपात वाढलेला दिसून येत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी असलेली बेडची संख्या जवळपास पूर्ण झालेली आहे. उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी जवळपास ४० बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आजमितीस तालुक्यात सध्या उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या ८८ आहे. मात्र, त्यापैकी ४८ व्यक्तींना त्रास होत नसल्याने स्वगृही उपचार घेत आहेत.ऑक्सिजन पुरवठा मुबलक स्वरूपात उपलब्ध आहे. मात्र, रुग्णसंख्यावाढीचा वेग या स्वरूपात राहिल्यास रुग्णांसाठी बेडची समस्या निश्चितच निर्माण होणार आहे. त्या कारणास्तव जनतेने आपल्या नैतिक कर्तव्या ला जागून योग्य खबरदारी घेणे अगत्याचे आहे. जनतेने कोरोना हा विषय गांभीर्याने घेणे आजमितीस अगत्याचे झाले आहे. तालुका प्रशासन आणि पोलीस दल कसोशीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत जनतेला कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगत आहेत. मात्र, मला काही होत नाही.   अशा निरर्थक विचारांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. गुरुवारी श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी नागरिकांना आवाहन करत असताना दिसून आले. श्रीवर्धन पोलीस ठाणे व दिघी सागरी पोलीस ठाणे यांनी लॉकडाऊन कालावधीमध्ये कायद्याचा भंग करणाऱ्या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई ली आहे. तालुक्‍यात एकूण ४२ हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. शहरात पोलीस दलाच्या मदतीसाठी अतिरिक्त पोलीस दलाची ३० कर्मचाऱ्यांची तुकडी गुरुवारी हजर झाली आहे.

तालुक्यातील बाधितांचा आकडा ६३३ च्या जवळतालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६३३ च्या जवळ पोहोचला. उपचार घेऊन ५१२ व्यक्ती स्वगृही परतल्या आहेत, मात्र २६ कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमवावा लागलेला आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर ढवळे, डॉ.अभिजित कुलकर्णी सर्वतोपरी सेवा पुरविण्याचा प्रयत्न करत आहेत.

कायद्याचा भंग करणाऱ्यांविरोधात आम्ही दंडात्मक स्वरूपाची कारवाई केलेली आहे. लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन होणे गरजेचे आहे.-प्रमोद बाबर, पोलीस निरीक्षक श्रीवर्धन

जनतेने विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. कायद्याचा भंग करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल.          - संदीप पोमन, सहायक पोलीस            निरीक्षक दिघी, सागरी पोलीस ठाणे

श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या अनुषंगाने तालुका प्रशासनाने योग्य ती सर्व खबरदारी घेतलेली आहे. जनतेने सहकार्य करावे, ही विनंती.-सचिन गोसावी, तहसीलदार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या