कर्जत : तालुक्यातील पूर्व भाग हा राजनाला कालव्यामुळे ओलिताखाली आला आणि सधन झाला; पण यंदा पाण्याची कमतरता लक्षात घेता, कालव्याचे पाणी शेतीसाठी सोडण्याची शक्यता कमी आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाने आयोजित केलेल्या गावबैठका अवघ्या दोन तासांत उरकल्या.राज्यावरील दुष्काळाची भीती लक्षात घेता, आहे ते पाणी वाचवण्याचा निर्णय पाटबंधारे विभाग घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याचे पाणी सोडण्याबाबत आयोजित केलेल्या शेतकरी गाव बैठका पाटबंधारे विभागाने अक्षरश: गुंडाळल्या. पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. वैजनाथ, कडाव आणि गौरकामथ या तिन्ही बैठका केवळ १५ मिनिटांत आटोपण्यात आल्याने सर्व शेतकरी आक्र मक झाले.पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांचे म्हणणे एकूण न घेता, १५ मिनिटांत बैठक संपवली. दरवर्षी १५ डिसेंबरपर्यंत पाणी सोडण्यात येईल, असे नेहमीचे उत्तर देऊन बोळवण केली; पण प्रत्यक्षात त्या तारखेला पाणी सोडले जात नाही, त्यामुळे शेतकºयांनी शेती करायची तरी कशी? त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी राजनालाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी राजनाला खचला आहे. भगदाड पडले आहे, काही ठिकाणी गळती लागली आहे. तर ठोंबरवाडीमधील पाणी तलावात जाऊन ते पाणी रस्त्यावर, शेतामध्ये जाऊन नासाडी होत आहे.राजनाला कालवा हा आमच्या भागातील शेतकºयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे शेतकºयांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय पाटबंधारे विभाग घेऊ शकत नाही.- तानाजी चव्हाण, प्रगत शेतकरीआम्ही १५ डिसेंबर रोजी पाणी सोडत आहोत, असा गैरसमज शेतकºयांत पसरविण्यात आला आहे.- शशिकांत दाभेरे,उपअभियंता
राजनाल्याचे पाणी शेतीसाठी मिळण्याची शक्यता कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:43 AM