शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

वाढत्या स्वाइन फ्लूचा धोका

By admin | Published: August 18, 2015 2:56 AM

शहरात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सहावरून आठवर पोहचली आहे. तसेच संशयित रुग्णांची संख्या देखील २१ झाली आहे. या अनुषंगाने पनवेल

वैभव गायकर, पनवेलशहरात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सहावरून आठवर पोहचली आहे. तसेच संशयित रुग्णांची संख्या देखील २१ झाली आहे. या अनुषंगाने पनवेल नगरपरिषद सतर्क झाली असून शहरातील डुक्कर मालकांना नोटिसा बजावून डुकरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याचे आदेश दिले आहेत. स्वाइन फ्लू हा संसर्गित डुकरापासून एच१एन१ या विषाणूपासून पसरतो. खोकला येणे, गळ्यामध्ये खवखव, ताप येणे, डोकेदुखी, नाकातून पाणी गळती आदी या आजाराची लक्षणे आहेत. पनवेल शहरामध्ये स्वाइन फ्लूचे एकूण चार रुग्ण आहेत. यापैकी चारही रुग्ण ठाणा नाका परिसरातील आहेत. या परिसरात डुकरांचा वावर सर्वात जास्त आहे. वातावरणातील बदल या आजाराला पूरक असल्यामुळे नगरपरिषदेने शहरात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात डुकरांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या १२ मालकांना नोटिसा बजावून शहरातील डुकरांना ४८ तासांच्या आत हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात वाल्मीकी नगर, इंदिरा नगर, लक्ष्मी वसाहत झोपडपट्टी आदी परिसरात डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. शहरात ही संख्या १०० च्या वर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नगरपरिषदेकडे शहरातील डुकरांचा अधिकृत आकडा उपलब्ध नसला तरी शहरातील सर्वच डुकरांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. पनवेल नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक डॉॅ. दिलीप कदम म्हणाले की, नगरपरिषदेच्या वतीने स्वाइन फ्लूच्या निवारणासाठी तत्काळ पावले उचलण्यात आली आहेत. त्यासाठी शहरात जनजागृतीपर फलक लावले आहेत, तसेच शहरात दवंडी देखील बजावण्यात आली आहे. स्वाइन फ्लूच्या निवारणासाठी सतर्कता म्हणून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात एकूण १३ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. जंतुनाशक फवारणी, धुरीक रण फवारणी आदी जबाबदारी या पथकाची राहणार आहे. तसेच नियमित १० जणांचे पथक देखील यासाठी कार्यरत असणार आहे. स्वाइन फ्लूच्या निवारणासाठी एमजीएम रुग्णालय, कामोठे याठिकाणी २० खाटांचा विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी एच१एन१ संशयित रुग्ण व लागण झालेल्या रुग्णांवर देखरेख ठेवली जाणार असून त्यांच्यावर स्वाइन फ्लू निवारणासाठी औषधोपचार केले जाणार आहे, अशी माहिती पनवेलमधील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एस.लोहारे यांनी दिली. याठिकाणी काही अडचण निर्माण झाल्यास अधिक माहितीसाठी ग्रामीण रुग्णालय, पनवेल याठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .