भूस्खलनाचा धोका १०३ गावांना, धोकादायक गावांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:10 AM2018-05-16T03:10:11+5:302018-05-16T03:10:11+5:30

जिल्ह्यात १०३ गावे दरडप्रवण अर्थात भूस्खलनाचा धोका (लँडस्लाइड प्रोन) असल्याचा अहवाल भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने रायगड जिल्हा प्रशासनास दिला आहे.

The risk of landslides is to train 103 villages, to train dangerous villages | भूस्खलनाचा धोका १०३ गावांना, धोकादायक गावांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन

भूस्खलनाचा धोका १०३ गावांना, धोकादायक गावांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन

Next

- जयंत धुळप 
अलिबाग : जिल्ह्यात १०३ गावे दरडप्रवण अर्थात भूस्खलनाचा धोका (लँडस्लाइड प्रोन) असल्याचा अहवाल भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने रायगड जिल्हा प्रशासनास दिला आहे. यापैकी तीव्र धोकादायक श्रेणीत ९, अतिधोकादायक श्रेणीत ११, धोकादायक श्रेणीत ८३ गावे असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, यंदा पाऊस सुरू होण्यापूर्वी या गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यासाठी गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदीना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जुलै २००५ मध्ये भूस्खलन व दरड कोसळून झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने शिफारस केल्यानुसार दरडप्रवण क्षेत्रात रचनात्मक आणि अरचनात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
दरडप्रवण अर्थात भूस्खलनाचा धोका असणाऱ्या १०३ गावांपैकी सर्वाधिक ४९ गावे महाड तालुक्यात आहेत. उर्वरित तालुक्यांत पोलादपूर तालुक्यात १५, रोहा-१३, म्हसळा-६, माणगाव-५, सुधागड, खालापूर, कर्जत, पनवेल प्रत्येकी ३, श्रीवर्धन तालुक्यात २, तर तळा तालुक्यात एका गावाचा समावेश असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
१०३ गावांतील ग्रामस्थांना प्रशिक्षित करण्यासाठी १६ मे रोजी रोहा, १७ मे रोजी माणगाव येथे, १८ मे रोजी महाड येथे तर १९ मे रोजी पोलादपूर येथे प्रशिक्षण कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक आदी एकूण ५१५ प्रमुख समाजघटकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. हे ५१५ प्रमुख समाजघटक पुढे गावात जाऊन ग्रामस्थांना प्रशिक्षित करतील आणि संभाव्य आपत्तीप्रसंगी करायचे नियोजन सर्वांना सांगणार आहेत. पावसाळ्यात दरड कोसळल्यावर परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येते, अशा वेळी घ्यावयाच्या काळजीबाबतही या वेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
>तातडीच्या कामांकरिता जिल्हाधिकाºयांचे निर्देश
दरडप्रवण गावांमधील डोंगर उताराकडील बाजूस डोंगर कापण्याचे काम करू नये, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाणी वाहून नेणाºया मार्गातील अडथळे दूर करावे, पावसाळी हंगामात जमिनीस भेगा पडणे, अस्थिर भूभाग असणे यावर लक्ष ठेवून जनजागृती करणे, डोंगर उतारावरील मोठे दगड हटवणे, ही कामे तत्काळ सुरू करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान, सध्याच्या तप्ततेत तापणारे खडक व कातळ आणि पहिल्या पावसाचे त्यावर पडणारे पाणी यातून खडक फुटण्याच्या संभाव्य धोक्याचेदेखील सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले.


भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणानुसार तालुकानिहाय गावे
महाड ०५ ०६ ३८ ४९
पोलादपूर ०० ०२ १३ १५
रोहा ०० ०२ ११ १३
म्हसळा ०२ ०० ०४ ०६
माणगाव ०० ०० ०५ ०६
पनवेल ०० ०० ०३ ०३
खालापूर ०१ ०० ०२ ०३
कर्जत ०१ ०० ०२ ०३
सुधागड ०० ०० ०३ ०३
श्रीवर्धन ०० ०१ ०१ ०२
तळा ०० ०० ०१ ०१
एकूण ०९ ११ ८३ १०३
दरड कोसळण्यास अतिवृष्टी हे एक महत्त्वाचे कारण असून कमी वेळेत ५०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता अधिक असते.
दरडग्रस्त गावातील नागरिकांनी जवळच्या महसूल मंडळस्तरीय पर्जन्यमापक यंत्रावरील दैनंदिन पावसाच्या नोंदीची माहिती घेऊन अतिवृष्टी होत असल्यास स्थलांतरित व्हावयाचे आहे.

Web Title: The risk of landslides is to train 103 villages, to train dangerous villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.