बदलत्या वातावरणाचा आंबा उत्पादनाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:26 AM2020-01-11T00:26:01+5:302020-01-11T00:26:08+5:30

गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील सातत्याने होत असलेल्या बदलामुळे आंबा उत्पादन धोक्यात आले आहे.

Risk of mango production in changing environment | बदलत्या वातावरणाचा आंबा उत्पादनाला धोका

बदलत्या वातावरणाचा आंबा उत्पादनाला धोका

googlenewsNext

सिकंदर अनवारे
दासगाव : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील सातत्याने होत असलेल्या बदलामुळे आंबा उत्पादन धोक्यात आले आहे. या बदलामुळे आलेल्या मोहोरावर कीड निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नियमित औषधांची फवारणी करावी, असे आवाहन महाड कृषी उप विभागीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी केले आहे.
महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन या चारही तालुक्यांतील हवामान आंब्याला पोषक आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यांमध्ये ९ हजार ७७५ हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याचे उत्पन्न घेण्यात येते. महाड तालुक्यात ७२५ हेक्टर, पोलादपूरमध्ये १५१.३५ हेक्टर, म्हसळामध्ये १,८७९ हेक्टर तर श्रीवर्धनमध्ये चार हजार ६६५.३५ हेक्टर क्षेत्रांमध्ये आंब्याचे उत्पादन घेतले जाते. या क्षेत्रात सातत्याने वातावरणात बदल होत आहे. या सध्याच्या बदलामुळे शेतकऱ्यांनी सावध राहाण्याची आवश्यकता आहे. ज्या वेळी मोहोर दिसू लागतो, त्या वेळी पहिली फवारणी पोपटी रंगाच्या पालवीवर करावी. या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाºया तुडतुड्यांपासून संरक्षण होते. तुडतुड्यामुळे पानावर चिकटा पडल्याने झाडाला मुंग्या येण्याची शक्यता असते. या फवारणीमुळे मुंग्यांपासूनही संरक्षण होते असे कृषी पर्यवेक्षक रमेश वाघमारे आणि कृषी सहायक किरण कोकरे यांनी सांगितले.
>‘भुरी’चा प्रादुर्भाव
गेल्या काही दिवसांपासून हवामानातील सतत होणाºया बदलामुळे आंब्यावरील मोहरावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागत असला, तरी महाड पोलादपूर तालुक्यामध्ये याचे प्रमाण अत्यल्प असल्याने वेळीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. महाड, पोलादपूर तालुक्यांतील शेतकºयांनी आंबा पिकाप्रमाणे शेती विषयक अन्य काही अडचणी असल्यास कृषी पर्यवेक्षक रमेश वाघमारे, कृषी सहायक किरण कोकरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उप विभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रफल्ल बनसोडे यांनी केले आहे.

Web Title: Risk of mango production in changing environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.