कार्तिकी एकादशीनिमित्त रायगडमध्ये २१८ मंदिरांत विधीवत पूजा

By निखिल म्हात्रे | Published: November 23, 2023 05:29 PM2023-11-23T17:29:54+5:302023-11-23T17:30:31+5:30

मंदिर विश्वस्त आणि संयोजन समितीच्या वतीनेही भाविकांना दर्शनात कोणतीही असुविधा होवू नये, याकरिता उत्तम नियोजन केले होते. प्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

Ritual worship in 218 temples in Raigad on the occasion of Kartiki Ekadashi | कार्तिकी एकादशीनिमित्त रायगडमध्ये २१८ मंदिरांत विधीवत पूजा

कार्तिकी एकादशीनिमित्त रायगडमध्ये २१८ मंदिरांत विधीवत पूजा

अलिबाग - कार्तिकी एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील सुमारे २१८ विठ्ठल मंदिरांत गुरुवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात कार्तिकी एकादशी साजरी करण्यात आली. अलिबाग शहराजवळच्या वरसोली येथील प्राचीन आंग्रेकालीन विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तर पाल्हे गावात एकादशीनिमित्त पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अलिबाग तालुक्यातील भक्तगणांनी दर्शनाकरिता वरसोली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गर्दी केली होती. दरम्यान, मंदिरात पहाटेपासूनच विविध भजन मंडळांनी आपली भजन सेवा रुजू केली. मंदिर विश्वस्त व संयोजन समितीच्या वतीने देखील भाविकांना दर्शनात कोणतीही असुविधा होवू नये याकरिता उत्तम नियोजन केले होते. प्रसादाची देखील व्यवस्था ठेवण्यात आली होती.

कार्तिकी एकादशीच्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता जिल्ह्यात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मंदिर व्यवस्थापनाने विविध उपयायोजना केल्या होत्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचाही ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकादशीच्या आदल्या दिवसापासून मंदिर व्यवस्थापनाने जय्यत तयारीला सुरवात केली होती. आज पहाटे जिल्ह्यातील मंदिरांमध्ये श्रीविठ्ठल-रुक्मिणीची विधीवत पूजा पुरोहितांच्या हस्ते पार पडल्यानंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर दिवसभर मंदिरांसमोर भाविकांनी लांबचलांब रांगा लावून श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.

श्रीविठ्ठल-रुक्मिणीला तुळस प्रिय असल्याने ठिकठिकाणच्या मंदिरासमोर तुळशीच्या माळा विकणार्‍यांचीही गर्दी झाल्याचे दिसून आले. काही मंदिरांमध्ये भजनासह किर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणार्‍या खालापूर तालुक्यातील साजगावचे श्रीविठ्ठल मंदीर आणि अलिबाग जवळील वरसोली येथील आंग्रेकालीन श्रीविठ्ठल मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होते.

दरम्यान, गावोगावच्या श्रीविठ्ठल मंदिरातही भाविकांची गर्दी झाली होती. वरसोलीच्या आंग्रेकालीन श्रीविठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशी सोहळ्याचे आयोजन केले गेले आहे. या मंदिरात देवस्थानचे मुख्य विश्वत रमेश नाईक आणि मनिषा नाईक या दाम्पत्यांनी श्रीविठ्ठल-रुक्मिणीची विधीवत पूजा केली.

Web Title: Ritual worship in 218 temples in Raigad on the occasion of Kartiki Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग