काशिदमध्ये ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:28 AM2018-12-16T05:28:15+5:302018-12-16T05:28:41+5:30

मुरुडच्या पर्यटनाला मिळणार चालना : जंजिरा आणि पद्मदुर्ग किल्ल्यांचा प्रवास होणार सुकर

Ro-Ro project with breakwater bundle in Kashid | काशिदमध्ये ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो प्रकल्प

काशिदमध्ये ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो प्रकल्प

Next

वशेष प्रतिनिधी 

अलिबाग : आता मुंबईतून पर्यटकांना आपली वाहने घेऊन थेट काशिद येथे येता येणार आहे. मेरीटाईम बोर्डाने तयार केलेल्या ११२ कोटी रुपयांच्या प्रस्तावास केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने मंजुरी दिली असून आहे. समुद्राच्या लाटा थोपविण्यासाठी आवश्यक ब्रेकवॉटर बंधाºयासह रो-रो जेट्टी आणि पॅसेंजर जेट्टी उभारण्याकरिताचा हा प्रस्ताव आहे.

सागरमाला प्रकल्पांतर्गत ही सेवा सुरू करण्यात येणार असून यामुळे काशिद हे ठिकाण मुंबईशी जलमार्गानेही थेट जोडले जाणार आहे. सीआरझेड मॉनिटरिंग कमिटीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रस्तावित काशिद रो-रो सेवेबाबत चर्चा होवून, प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वांती काशिद परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून पर्यटकांना सागरी पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. सध्या खराब रस्ते, वाहतूककोंडीचा त्रास यामुळे सद्यस्थितीत मुंबईपासून चार ते पाच तासांचा प्रवास करून, रेवदंडा व काशिद येथे मुंबईकरांना अलिबाग मार्गे रस्त्यानेच जावे लागते. तितकाच वेळ परतीच्या प्रवासाला लागत असल्याने पर्यटक काशिदला जाणे टाळतात. मुंबई-पुण्यातील पर्यटकांसह देश-विदेशातील पर्यटक येथे येत असतात. रो-रो सेवेने मुंबई-काशिद थेट जोडले गेल्यास येथील पर्यटन व्यवसायाला मोठी गती मिळू शकणार आहे. काशिद रो-रो प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाची त्यास मान्यता मिळाली असून आता राज्य शासनाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात येत आहे. ही मान्यता प्राप्त झाल्यावर तत्काळ निविदा काढण्याचे काम सुरू होईल,अशी माहिती मेरीटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली आहे.

केंद्र शासनाकडून मंजुरी, दोन्ही जेट्टीसाठी १६ कोटी
च्दोन्ही ठिकाणी नवीन जेट्टी बांधावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मेरीटाईम बोर्डाचे जंजिरा आणि पद्मदुर्ग येथे प्रत्येकी ८ कोटी रु पये अंदाजित खर्चाच्या जेट्टी बांधण्याचा आराखडा केंद्र शासनाला सादर केला होता. यास केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. पद्मदुर्ग आणि जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी आगरदांडा येथे बांधण्यात येणाºया जेट्टीचे कम पूर्ण झालेले आहे. मात्र, जंजिरा किल्ल्यामध्ये जेट्टी नसल्याने तेथे पर्यटकांना लहान होड्यांमधून उतरताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. आतापर्यंत लहान होड्यांमधूनच प्रवास करावा लागत होता. जेट्टी झाल्यानंतर मोठ्या होड्याही किल्ल्यांपर्यंत जावू शकणार आहेत. सागरमाला प्रकल्पांतर्गतच या जेट्टी बांधण्यात येत आहेत. या दोन्हीसाठी एकूण १६ कोटी रु पये खर्च केले जाणार आहेत. पर्यटकांची सुरक्षा हा दृष्टिकोन ठेवून या दोन्ही जेट्ट्या उभारल्या जाणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली आहे.

जंजिरा, पद्मदुर्ग किल्ल्यांसाठी नवीन जेट्टी
च्जंजिरा आणि पद्मदुर्ग हे जलदुर्ग पाहण्यासाठी येणाºया पर्यटकांच्या बिनधोक व सुकर प्रवासाकरिता मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून पद्मदुर्ग आणि जंजिरा किल्ल्याच्या परिसरात दोन्ही ठिकाणी प्रत्येकी आठ कोटी रुपये खर्चून नवीन जेटी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
च्जंजिरा आणि पद्मदुर्ग या दोन जलदुर्गांना भेट देण्याकरिता जलप्रवास करताना विद्यमान परिस्थितीत पर्यटकांना मोठी कसरत करावी लागते. लाटांमुळे होड्या अस्थिर होत असल्याने चढ-उतरताना पाय घसरून पाण्यात पडण्याच्या घटना घडत असतात.
च्लहान मुले, वयोवृद्ध, महिला यांना होडीतून उतरणे कठीण जाते. अशाही परिस्थितीत जंजिरा आणि पद्मदुर्ग या दोन जलदुर्गांना भेट देणाºया पर्यटकांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ विचारात घेवून या दोन नव्या जेट्टी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

Web Title: Ro-Ro project with breakwater bundle in Kashid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.