अलिबाग, मुरुडमधील रस्त्यांची चाळण

By admin | Published: October 7, 2016 05:30 AM2016-10-07T05:30:29+5:302016-10-07T05:30:29+5:30

अलिबाग, रेवदंडा आणि मुरुडमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरु ड या दोन तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था

Road blocks in Alibaug, Murud | अलिबाग, मुरुडमधील रस्त्यांची चाळण

अलिबाग, मुरुडमधील रस्त्यांची चाळण

Next

 बोर्ली-मांडला /मुरुड : अलिबाग, रेवदंडा आणि मुरुडमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरु ड या दोन तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्याऐवजी खड्ड्यांतून मार्ग काढण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. ५० किमीच्या प्रवासासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
अलिबाग ते मुरु ड या रस्त्यासाठी कोट्यवधी रु पयांचा निधी खर्च करूनसुद्धा हा निधी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जात आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याला याचे सोयरसुतक नाही. अलिबाग हे रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा परिषद आदी अनेक शासकीय निमशासकीय कार्यालये तसेच महाविद्यालये आहेत. या ठिकाणी विविध कामासाठी जिल्हाभरातील नागरिक येत असतात. ठिकठिकाणी डांबर व खडीने खड्डे भरून त्याची मलमपट्टी करण्यात आली, मात्र जून महिन्यात वरुणराजाचे आगमन होताच संपूर्ण रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सर्वत्र खड्डे पडण्यास सुरवात झाली. मुसळधार पावसामुळे तसेच अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे लहान लहान खड्ड्यांनी धोक्याचे स्वरूप घेतले आहे. अलिबाग ते रेवदंडा या रस्त्याची तर अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे येथून प्रवास करणे जिकिरीचे आहे. अलिबाग-रेवदंडा मार्गावरील आक्षी ते नागाव खारगल्ली त्याचप्रमाणे बेलकडे फाटा ते सहाण मार्गे नागाव हा रस्ता खड्ड्यांमुळे दिसेनासा झाला आहे. दिवसेंदिवस हा रस्ता बिकट होऊन जीवघेणा बनत आहे.
वर्षापूर्वी अलिबाग-रेवदंडा रस्त्यासाठी दहा कोटी रु पये मंजूर झाले असल्याचे अलिबाग बांधकाम प्रभारी अभियंता प्रल्हाद जाधव यांनी सांगितले. त्याप्रमाणे आमदार सुभाष पाटील यांच्या निधीतून कोट्यवधी रु पये खर्च करून मुरु ड तालुक्यातील साळाव ते मुरु ड दरम्यान धोकादायक असणाऱ्या रस्त्याचे रु ंदीकरण तसेच काही ठिकाणी रस्त्यावर असणारे खड्डे बुजवून कार्पेट टाकण्यात आले होते मात्र जूनच्या पहिल्याच पावसात रस्त्यावरील कार्पेट निघून जाऊन त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नव्याने ॅयासाठी निविदा काढून रस्त्याच्या कामाला डिसेंबरमध्ये सुरु वात केली जाईल, असे जाधव म्हणाले.(वार्ताहर)
पालकमंत्र्यांनी रायगडमधील रस्त्यांची पाहणी करावी
च्नागोठणे : रायगड जिल्ह्यात कोठेही गेलो तरी स्थानिकांना आणि प्रवाशांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जायची वेळ वाहनचालकांवर येत आहे. रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी मुंबईतून एकदा वेळ काढून रायगडच्या पंधराही तालुक्यात फिरण्यासाठी रस्ते पाहणीचा विशेष दौरा शक्य असल्यास संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांसमवेत आयोजित करावा, अशी मागणी माजी सरपंच तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते फरमान दफेदार यांनी केली आहे. रायगड जिल्ह्याला सध्या खड्डेमय रस्त्यांनी वेढले आहे.
च्खड्ड्यांच्या विळख्यातून मुंबई-गोवा महामार्गही सुटलेला नाही. सध्या वडखळपासून अलिबागमार्गे मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्यालाही ग्रहण लागले आहे. येथून प्रवास करताना वाहनचालकांच्या नाकी नऊ येत आहे. जिल्ह्यात कोठेही जायचे असेल, तर खड्डेमय रस्त्यांमुळे इच्छित स्थळी वेळेत जाता येत नाही. पावसामुळे रस्त्यावरील खड्डे भरता येत नाहीत, हे कारण सांगितले जात असले तरी पावसाने उघडीप दिल्यानंतर सुद्धा खड्डे भरायची तसदी घेतली जात नसल्याचे दफेदार यांचे म्हणणे आहे.

Web Title: Road blocks in Alibaug, Murud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.