शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

अलिबाग, मुरुडमधील रस्त्यांची चाळण

By admin | Published: October 07, 2016 5:30 AM

अलिबाग, रेवदंडा आणि मुरुडमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरु ड या दोन तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था

 बोर्ली-मांडला /मुरुड : अलिबाग, रेवदंडा आणि मुरुडमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरु ड या दोन तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्याऐवजी खड्ड्यांतून मार्ग काढण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. ५० किमीच्या प्रवासासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.अलिबाग ते मुरु ड या रस्त्यासाठी कोट्यवधी रु पयांचा निधी खर्च करूनसुद्धा हा निधी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जात आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याला याचे सोयरसुतक नाही. अलिबाग हे रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा परिषद आदी अनेक शासकीय निमशासकीय कार्यालये तसेच महाविद्यालये आहेत. या ठिकाणी विविध कामासाठी जिल्हाभरातील नागरिक येत असतात. ठिकठिकाणी डांबर व खडीने खड्डे भरून त्याची मलमपट्टी करण्यात आली, मात्र जून महिन्यात वरुणराजाचे आगमन होताच संपूर्ण रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सर्वत्र खड्डे पडण्यास सुरवात झाली. मुसळधार पावसामुळे तसेच अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे लहान लहान खड्ड्यांनी धोक्याचे स्वरूप घेतले आहे. अलिबाग ते रेवदंडा या रस्त्याची तर अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे येथून प्रवास करणे जिकिरीचे आहे. अलिबाग-रेवदंडा मार्गावरील आक्षी ते नागाव खारगल्ली त्याचप्रमाणे बेलकडे फाटा ते सहाण मार्गे नागाव हा रस्ता खड्ड्यांमुळे दिसेनासा झाला आहे. दिवसेंदिवस हा रस्ता बिकट होऊन जीवघेणा बनत आहे. वर्षापूर्वी अलिबाग-रेवदंडा रस्त्यासाठी दहा कोटी रु पये मंजूर झाले असल्याचे अलिबाग बांधकाम प्रभारी अभियंता प्रल्हाद जाधव यांनी सांगितले. त्याप्रमाणे आमदार सुभाष पाटील यांच्या निधीतून कोट्यवधी रु पये खर्च करून मुरु ड तालुक्यातील साळाव ते मुरु ड दरम्यान धोकादायक असणाऱ्या रस्त्याचे रु ंदीकरण तसेच काही ठिकाणी रस्त्यावर असणारे खड्डे बुजवून कार्पेट टाकण्यात आले होते मात्र जूनच्या पहिल्याच पावसात रस्त्यावरील कार्पेट निघून जाऊन त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नव्याने ॅयासाठी निविदा काढून रस्त्याच्या कामाला डिसेंबरमध्ये सुरु वात केली जाईल, असे जाधव म्हणाले.(वार्ताहर)पालकमंत्र्यांनी रायगडमधील रस्त्यांची पाहणी करावीच्नागोठणे : रायगड जिल्ह्यात कोठेही गेलो तरी स्थानिकांना आणि प्रवाशांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जायची वेळ वाहनचालकांवर येत आहे. रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी मुंबईतून एकदा वेळ काढून रायगडच्या पंधराही तालुक्यात फिरण्यासाठी रस्ते पाहणीचा विशेष दौरा शक्य असल्यास संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांसमवेत आयोजित करावा, अशी मागणी माजी सरपंच तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते फरमान दफेदार यांनी केली आहे. रायगड जिल्ह्याला सध्या खड्डेमय रस्त्यांनी वेढले आहे.च्खड्ड्यांच्या विळख्यातून मुंबई-गोवा महामार्गही सुटलेला नाही. सध्या वडखळपासून अलिबागमार्गे मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्यालाही ग्रहण लागले आहे. येथून प्रवास करताना वाहनचालकांच्या नाकी नऊ येत आहे. जिल्ह्यात कोठेही जायचे असेल, तर खड्डेमय रस्त्यांमुळे इच्छित स्थळी वेळेत जाता येत नाही. पावसामुळे रस्त्यावरील खड्डे भरता येत नाहीत, हे कारण सांगितले जात असले तरी पावसाने उघडीप दिल्यानंतर सुद्धा खड्डे भरायची तसदी घेतली जात नसल्याचे दफेदार यांचे म्हणणे आहे.