अरुण जंगम
म्हसळा : अथांग समुद्रकिनारा, कौलारू घरे व नारळ सुपारीच्या बागा यामुळे कोकणचं सौंदर्य टिकू न आहे. म्हसळा व श्रीवर्धन या दोन्ही तालुक्यात पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे, परंतु ग्रामीण भागातील रस्ते पर्यटन विकासात अडथळा ठरत आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे एसटी, रिक्षा कोणतीच वाहने ग्रामीण भागातील रस्त्यावरून प्रवास करण्यास तयार नाहीत. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
पर्यटनाच्या विकासासाठी रस्ते विकास आवश्यक आहे, परंतु ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. म्हसळा तालुका हा दुर्गम आहे. तालुक्यामध्ये असलेली गावे ही तालुक्याच्या ठिकाणापासून दूर व डोंगरात वसलेली आहेत. या गावातील नागरिकांना बाजारहाट करणे त्याचप्रमाणे शासकीय कामांकरिता म्हसळा तालुक्यातच यावे लागते. यासाठी एसटी हे एकमेव साधन असल्याने या गावांतील नागरिक एसटी बसवरच अवलंबून आहेत, मात्र मागील काही वर्षापासून तालुक्यातील काही भागातील रस्त्यांची चाळण झाल्याने बसशिवाय पर्यायी साधन म्हणून रिक्षाचालक देखील या भागाकडे येण्यास नकार देत आहेत. काही भागात रस्त्यांची झालेली हालत पाहून एसटी महामंडळ देखील बसेस पाठविण्यास टाळाटाळ करीत आहे.म्हसळा तालुक्यातील कोळवट, रातीवणे, भापट ,चिरगाव, सांगवड, कोंदरी गावांच्या रस्त्याची परिस्थिती बिकट आहे. म्हसळा-कोळवट १५ किमी चे अंतर आहे. कोळवट ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये कोळवट, भापट, रातीवणे या गावांचा समावेश आहे. कोळवट ग्रामपंचायतीची लोकसंख्या ११५० च्या जवळपास आहे. चिरगाव ते कोलवट ९ किमी रस्त्याची परिस्थिती दयनीय आहे. १९८४ व १९९८ या वर्षी चिरगाव ते कोळवट रस्त्याचे काम झाले होते. मुख्य रस्त्यावर फक्त दगड व माती निदर्शनांस येत आहे. म्हसळा ते सांगवड १४ किमीचे अंतर आहे. म्हसळा ते केल्टे रस्ता सुस्थितीत आहे, परंतु केल्टे ते सांगवड रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी हा रस्ता तयार केला, त्यानंतर आजतागायत दुरु स्ती करण्यात आलेले नाही. म्हसळा, गाणी फाटा, पानवा, कोंदरी, तळवडे, कोळे व साखरोणे मार्गावर कोळे ते साखरोणे चार किलोमीटर रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली आहे. त्यामुळे चालणारी एसटी वाहतूक बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे.श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडला, कारविणे, गडबवाडी, मोहिते वाडी, वांजळे व आडी या गावातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. साधारणत: प्रत्येक रस्ता हा १६ फूटरु ंदीचा आहे. या रस्त्यावर प्रवासी वाहतूक चालते इतर वाहतुकीचे प्रमाण अतिशय अल्प आहे. तरी सुद्धा येथील रस्त्याची चाळण झालेली पहावयास मिळत आहे. कोलमांडला, कारविणे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कारविणेची लोकसंख्या ५९० च्या जवळपास आहे. गावातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यामुळे असंख्य अडचणीस सामोरे जावे लागत आहे. बोर्लीपंचतनपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर वांजळे गाव आहे, येथे मदगड किल्ला आहे. यामुळे येथील पर्यटक व शालेय विद्यार्थी सहलीसाठी मदगडची निवड करतात, परंतु बोर्लीपंचतन ते वांजळे रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम पर्यटनावर होत आहे.रस्ता दुरुस्त न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कारच्म्हसळा तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागात ताम्हणे करंबेवाडी, ताम्हणे करंबे, रातीवणे, कोलवट, भापट ही सहा गावे वसलेली आहेत, त्या गावाला दळणवळण करण्यासाठी प्रवासाचे साधन म्हणजे कोलवट रस्ता आहे, मात्र गेल्या १४ वर्षांपासून हा रस्ता नादुरु स्त आहे. अनेक वेळा या गावातील ग्रामस्थांनी विविध पक्षाला रस्ता करण्यासाठी साकडे घातले. लेखी निवेदने, प्रस्ताव दिले, परंतु रस्ता आज आहे तसाच आहे.च्त्यामुळे आगामी निवडणुकांआधी जर रस्त्याचे काम केले नाही, तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. कोलवट गावाअंतर्गत सहा गावांनी पंचक्र ोशी कमिटी स्थापन करून रखडलेला रस्ता पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला, मात्र कोणीही याची दखल घेतली नाही. या रस्त्यावरून प्रवास करायचा म्हणजे तारेवरची कसरत आहे.च्पावसाच्या दिवसात नादुरु स्त रस्त्यामुळे महामंडळ एसटी बसच्या फेऱ्या बंद करते. त्यामुळे ग्रामस्थांना दुप्पट किंमत मोजून खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. या सर्व प्रकरणाला कंटाळून पंचक्र ोशीची पहिली सभा घेऊन कमिटी स्थापन करून आगामी काळात जो राजकीय पक्ष रस्ता करेल, त्याच पक्षाला पंचक्र ोशीत स्थान दिले जाईल . नाही तर येणाºया निवडणुकीवर सहा गावे बहिष्कार टाकतील, असा एकमुखी ठराव घेण्यात आला.कोळवट रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकारणी फक्त निवडणुकीच्या काळात आश्वासने देतात. स्थानिकांमध्ये प्रशासन व राजकारणी मंडळींविषयी प्रचंड नाराजी आहे.- गोविंद तान्हू मोरे,तंटामुक्त गाव अध्यक्ष, कोळवटग्रामीण भागातील आडी, कारविणे, कोळवट, साखरोणे व सांगवड रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी बांधकाम विभागाने लवकरात लवकर लक्ष द्यावे.- संदीप गुरव, एसटी चालक,श्रीवर्धन आगारहे सर्व मार्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असल्याने या सर्व मार्गांची देखभाल दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे आहे, हा रस्ता हस्तांतरित न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग काही करू शकत नाही.- शामसाव शेट्टे, शाखा अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीवर्धन