केबलसाठी रस्त्याचे खोदकाम
By admin | Published: October 25, 2015 12:24 AM2015-10-25T00:24:15+5:302015-10-25T00:24:15+5:30
पावसाळ्यात फोर जी केबल टाकण्यावरून पनवेल नगर परिषदेमध्ये मोठे वादंग माजले होते. त्यातच परवानगी देण्यावरून आरोप-प्रत्योराप झाले होते. त्यामुळे काही महिने हे काम थांबविण्यात आले होते.
पावसाळ्यात फोर जी केबल टाकण्यावरून पनवेल नगर परिषदेमध्ये मोठे वादंग माजले होते. त्यातच परवानगी देण्यावरून आरोप-प्रत्योराप झाले होते. त्यामुळे काही महिने हे काम थांबविण्यात आले होते. मात्र मोबाइल कंपन्यांनी पुन्हा शहरातील मुख्य रस्त्यावर खोदकाम सुरू केल्याने पनवेलकरांमधून नाराजी व्यक्त होत आहे. खोदकामामुळे अपघातांचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पनवेल नगरपालिकेने फोर जीच्या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे. वास्तविक पाहता हे काम करीत असताना संबंधित कंपनीने अटी व शर्तीचे पालन करून अद्ययावत तंत्रप्रणालीने हे काम करायला हवे. शहरवासीयांना त्रास होणार नाही, पायाभूत सुविधांवर ताण येणार नाही, याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहतूक व रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही, अशी अट पालिकेने संबंधित कंपन्याना घातली आहे. मात्र तरीदेखील सर्व नियम धाब्यावर बसवून मोबाइल कंपन्या मनमानी करीत मुख्य रस्त्यावर खोदकाम करीत आहेत. यावेळी टाकण्यात येणारे मातीचे ढिगारे रस्त्यावर किंवा कडेला साचून आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. शहरामध्ये अरुंद रस्ते, अतिक्रमणामुळे वाहतूककोंडी नित्याचीच असून त्यात फोर जी केबलची भर पडल्याने नागरिक संतापले आहेत. (वार्ताहर)
मिडल क्लास सोसायटीची नाकाबंदी
सध्या मिडल क्लास सोसायटीमध्ये फोर जीची वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना काही सोसायट्यांचे रस्तेच बंद करण्यात आले आहेत. याच ठिकाणी पुरोहित, गांधी नामांकित रु ग्णालये आहेत. रुग्णवाहिकेची गरज भासल्यास ती आणायची कोणत्या रस्त्यावरून, आगीसारखी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी येणार कसे, असा प्रश्न परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.