नेरळमधील काँक्र ीटचा रस्ता दहा दिवसांत खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:18 AM2017-11-10T01:18:49+5:302017-11-10T01:18:49+5:30

नेरळ गावात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. निधी एमएमआरडीएचा पण काम पाहत असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून व्यवस्थित कामे

 The road to concrete in Kerala is open in ten days | नेरळमधील काँक्र ीटचा रस्ता दहा दिवसांत खुला

नेरळमधील काँक्र ीटचा रस्ता दहा दिवसांत खुला

Next

कर्जत : नेरळ गावात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. निधी एमएमआरडीएचा पण काम पाहत असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून व्यवस्थित कामे करून घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. कारण नेरळ हुतात्मा भाई कोतवाल चौकापासून टॅक्सी स्टँड या भागातील काँक्रीटचा रस्ता तयार झाल्यानंतर दहा दिवसांत तो प्रवासासाठी खुला केला आहे. यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ठेकेदारावर अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नेरळ गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी कोट्यवधीचा निधी दिला आहे. प्राधिकरण मुंबईमध्ये अन्य भागात कामाचा दर्जा कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. एमएमआरडीए कायम आपले नाव जपण्याचा प्रयत्न करीत असते, असे असताना नेरळ गावातील रस्त्यांची सुरू असलेली आरसीसी काँक्रीटची कामे प्राधिकरणाचे नाव धुळीस मिळविणारी ठरणार आहेत. नेरळ रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या हुतात्मा भाई कोतवाल चौकातून टॅक्सी स्टँड कार्यालयापर्यंत असलेल्या रस्त्याचे काँक्रीटकरण दिवाळीमध्ये केले. काँक्रीटकरण केल्यानंतर किमान २१ दिवस त्यावर पाणी साठवून ठेवले जाते. त्यासाठी आवश्यक डवरे केले जातात. मात्र केवळ दहा दिवसांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गावातील हुतात्मा हिराजी पाटील चौक ते तलाठी कार्यालय या रस्त्यावर काँक्रीटकरण करण्यासाठी दीड महिन्याहून अधिक काळ रस्ता वाहतुकीस बंद होता. गणपती, दसरा या काळात रस्ता बंद असल्याने त्या भागातील असलेल्या व्यापाºयांनी आणखी किती दिवस नुकसान सहन करायचे? असा प्रश्न करून रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. त्यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंत्याने व्यापाºयांना दमबाजी करीत २१ दिवस पाणी साठवून ठेवणार, या काळात रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. असे असताना नेरळ स्टेशन येथील रस्ता दहा दिवसांत खुला केला गेला आहे. यामुळे जि.प. बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची दादागिरी कुठे गेली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title:  The road to concrete in Kerala is open in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.