तळा शहरात रस्त्यांची दुर्दशा

By admin | Published: August 31, 2016 03:20 AM2016-08-31T03:20:27+5:302016-08-31T03:20:27+5:30

हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणरायाचे लवकरच आगमन होणार आहे, त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

Road depression in the downtown | तळा शहरात रस्त्यांची दुर्दशा

तळा शहरात रस्त्यांची दुर्दशा

Next

तळा : हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणरायाचे लवकरच आगमन होणार आहे, त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मंगलमूर्ती वाजतगाजत विराजमान होत असताना त्याला त्रास होवू नये अशी प्रत्येक नागरिकाची भावना असते. परंतु सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांशी रस्त्यांची चाळण झाली असून यामुळे सर्वत्र खड्डे पहावयास मिळत आहेत. हे खड्डे गणपतीपूर्वी बुजवावेत अशी नागरिकांची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हा प्रमुख रवी मुंढे यांच्या पुढाकाराने काही ठिकाणचे खड्डे बुजविले. परंतु सतत पडत असलेल्या पावसामुळे त्याचा उपयोग झाला नाही.
तळा नगरपंचायतीची अवस्था बिकट आहे. त्यांना काम करण्याची इच्छा असून ही गेली दोन अडीच महिने मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्यामुळे अनेक ठिकाण खर्च करण्यास अडचण निर्माण होत आहे. आर्थिक व्यवहार त्यांचे सहीनेच चालतो. परंतु ते नसल्यामुळे अनेक कामांना अडचण निर्माण झालेली आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी हा चार्ज तळा तहसीलदार भगवान सावंत यांच्याकडे दिला आहे. त्यांनी या कामासाठी त्वरित लक्ष घालून शहरातील रस्त्यावरील खड्डे त्वरित भरणे व दुरुस्ती गणपतीपूर्वी करावी अशी मागणी होत आहे.
याबाबत तहसीलदार भगवान सावंत यांच्याशी संपर्क साधला असता गणपतीपूर्वी खड्डे भरले जातील असे सांगितले. पाऊस सतत पडत असल्यामुळे काम देखील करता येत नाहीत. त्याचबरोबर रस्त्यावरील पथदिवे देखील लागणे जरुरीचे आहे. अनेक रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यासाठी नगर पालिका व तहसीलदार भगवान सावंत यांनी लक्ष देवून हे काम गणपतीपूर्वी पूर्ण करावे, तसेच इंदापूर-तळा-मांदाड या राज्य महामार्गावर देखील खड्डे भरणे जरुरीचे आहे. इंदापूर-तळा मार्गावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. गणपतीपूर्वी हे खड्डे सा. बां. विभाग माणगावने भरावेत अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Road depression in the downtown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.