रस्त्यावर वाढलेल्या झुडपांचा अडथळा , दुचाकीचालकांना होतोय त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:43 AM2017-12-22T02:43:54+5:302017-12-22T02:44:11+5:30
लोणेरेपासून पन्हळघरपर्यंतच्या साडेचार कि.मी. अंतराच्या रस्त्यावर सहवास फाट्यापासून पुढे काही ठिकाणी रस्त्यालगत वाढलेल्या व रस्त्यावर झुकलेल्या झुडपांचा येणाºया-जाणाºया वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. या वाढलेल्या झाडा-झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
माणगाव : लोणेरेपासून पन्हळघरपर्यंतच्या साडेचार कि.मी. अंतराच्या रस्त्यावर सहवास फाट्यापासून पुढे काही ठिकाणी रस्त्यालगत वाढलेल्या व रस्त्यावर झुकलेल्या झुडपांचा येणाºया-जाणाºया वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. या वाढलेल्या झाडा-झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाळ्यात जोमाने वाढलेल्या या झुडपांचा त्रास रस्त्यावरील वाहनांना व पादचाºयांना होत आहे. पन्हळघर, अंबर्ले, पन्हळघर बुद्रुक, आडी-वडाचा कोंड अशी गावे आणि काही वाड्या या रस्त्याशी संबंधित आहेत. येथून लोक लोणेरे व अन्य जवळपासच्या शहरात बाजारहाटीसाठी सतत आपल्या खासगी वाहनाने, रिक्षाने आणि बसने प्रवास करतात. शिवाय या परिसरातील विद्यार्थी लोणेरे येथील जे. बी. सावंत हायस्कूल, निकम इंग्लिश स्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ व गोरेगावमधील ना. म. जोशी शाळा व कॉलेज येथे शिकत असल्याने त्यांची या रस्त्यावरून सातत्याने वर्दळ असते. काही लोक रोजगारानिमित्तानेही जवळच्या बाजारपेठेत येथून ये-जा करत असतात.
तसेच या रस्त्यालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वसतिगृह आहे. शेजारीच विद्यापीठातील कर्मचाºयांचे सरस्वती व गोमती असे भव्य निवासी संकुल आहेत. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती शासकीय रोपवाटिकेतसुद्धा अनेक वृक्षप्रेमी या रस्त्यावरून ये-जा करताना रस्त्यालगतच्या झुडपांचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावरून अनेकदा मोठी वाहने बस, ट्रक, टेम्पो जात असतात, तेव्हा समोरून येणाºया छोट्या वाहनांना या रस्त्यावर वाढलेल्या झुडपांमुळे समोरून येणाºया वाहनांचा अंदाज येत नाही. शिवाय बोर, करवंद, खैर यासारख्या झाडा-झुडपांच्या काटेरी फांद्या रस्त्यावर आल्याने वाहनांना बाजू देताना दुचाकीस्वारांना दुखापत होत असते.
रस्त्यालगतच्या २५ ते ३० फूट रुंदीच्या व सुमारे ६० फूट खोलीच्या नाल्यात अनेकदा छोट्या वाहनांचे व दुचाकीस्वारांचे किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघातही येथे झाल्याचे अनेक वाहनचालकांचे म्हणणे आहे. तरीही रस्ते विभागाच्या कर्मचाºयांनी रस्त्यावर आलेल्या झुडपांच्या फांद्या, साइडपट्टीवरील गवत व छोटी झुडपे शिवाय नदीकठड्यावर वाढलेल्या वेली व झुडपांची तोड करावी, अशी मागणी स्थानिकांसह प्रवासी करत आहेत.