रायगड जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात

By निखिल म्हात्रे | Published: January 16, 2024 04:28 PM2024-01-16T16:28:07+5:302024-01-16T16:28:44+5:30

जिल्हा वाहतूक शाखेबरोबर जिल्ह्यातील वेगवेगळ्या संस्था, संघटनाच्या मदतीने ही जनजागृती सुरु केली आहे.

Road safety campaign started in Raigad district | रायगड जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात

रायगड जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात

अलिबाग - रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियन सप्ताहाला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून दुचाकी चालकांसह चारचाकी चालकांचे प्रबोधन केले जात आहे. जिल्हा वाहतूक शाखेबरोबर जिल्ह्यातील वेगवेगळ्या संस्था, संघटनाच्या मदतीने ही जनजागृती सुरु केली आहे.

नेहरू युवा केंद्र, रायगड- अलिबाग युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार, जिल्हा वाहतूक विभाग, रायगड- अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग, स्वयंसिद्धा सामजिक विकास संस्था रोहा, स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू युवा केंद्र रायगड जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला व जिल्हा वाहतूक शाखा, रायगड- अलिबाग पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद जयंती व सडक सुरक्षा सप्ताह अंतर्गत अलिबाग बस स्थानकासमोर नागरिकांमध्ये व वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यासाठी म्हणजेच दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करा, चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करावा, वेग मर्यादेपेक्षा अतिवेगात वाहन चालवू नये, मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, वाहन चालवताना लेन कटिंग करू नये, पादचाऱ्यांनी नेहमी फुटपाथचा वापर करावा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, रस्त्यावर धोकादायक रित्या वाहन चालवू नये, वाहन चालवताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्या अशा नियमांविषयी जनप्रबोधन करण्यात आले.

युवक युवतीने वाहतूक पोलिसांच्या सहाय्याने नियंत्रणासाठी सहकार्य केले. यावेळी या कार्यक्रमाचे नेतृत्व राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी, भारत सरकार तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी यांनी केले. तसेच यावेळी जिल्हा वाहतूक शाखा रायगड अलिबागचे पोलीस हवालदार प्रदीप झेमसे, पोलीस हवालदार किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश काळोखे, पोलीस हवालदार परम ठाकूर पोलीस अमलदार रुपेश शिर्के इ चलन समन्वयक मंगेश कावजी व स्पर्धा विश्व अकॅडमीचे युवक युवती उपस्थित होते.

Web Title: Road safety campaign started in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड