रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त रॅली
By admin | Published: January 14, 2017 06:52 AM2017-01-14T06:52:55+5:302017-01-14T06:52:55+5:30
कर्जत मधील अभिनव ज्ञानमंदिर मैदानावर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जतमध्ये राष्ट्रीय
कर्जत : कर्जत मधील अभिनव ज्ञानमंदिर मैदानावर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जतमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानात विद्यार्थ्यांचा सहभाग प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल, समर्थ मोटार ट्रेनिंग स्कूल कर्जत आणि कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या रॅली मध्ये चारशे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ‘दुख:द अपघात सुखद सुरक्षा’ असे या कार्यक्र माचे घोषवाक्य होते.
विद्यार्थ्यांच्या या जनजागृती रॅलीचे उपविभागीय पोलीचे अधिकारी जालींधर नारकुल यांच्या हस्ते कार्यक्र माचे उद्घाटन झाले. या प्रसंगी पोलीस निरिक्षक नजमुद्दीन मुल्ला, मोटार वाहन निरिक्षक उदय इंगळे, हरिभाऊ जेजुरकर, नगराध्यक्षा रजनी गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, नायब तहसीलदार लक्ष्मण खटके आदी उपस्थित होते. त्यानंतर रॅली कर्जत शहरातून कोंकण ज्ञानपीठ शिक्षण संकुलाकडे आली.
अभियांत्रिकी महाविद्यालायाच्या सेमिनार हॉल मध्ये रस्ता सुरक्षा विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात रस्त्यावरून सुरिक्षत वाहन चालविताना घ्यावयाची काळजी तसेच निष्काळजीणाने वाहन चालविण्यास होणारी हानी याबाबत माहिती सांगितली. याप्रसंगी संस्थेचे खिजनदार झुलकरनैन डाभिया, सचिव प्रदीप शृंगारपुरे, प्राचार्य डॉ. रवींद्र देशमुख, उपप्राचार्य राजकुमार नारखेडे आदी पोलीस निरिक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालवावीत आणि रस्ता अपघात टाळावा असे सांगितले. विनय मोरे यांनी आपल्या अनुभवी व्याख्यानातून कोणतेही वाहन चालवितांना मोबाईल वरून बोलू नये. चारचाकी वाहन चालवितांना पाण्याच्या बाटल्या, बॅगा आदी सामान खाली ठेऊ नका अगर खाली पडू देऊ नका कारण त्यामुळे ब्रेक दाबताना अडचण येऊ शकते व अपघात होऊ शकतो. असे स्पष्ट करून दृकश्राव पद्धतीने सचित्र माहिती दिली. विवेक भागवत यांनी सूत्रसंचालन तर निलेश मराठे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी प्रा. एस. एम. पाटील, प्रा. प्रीतम जुवाटकर, प्रा. परवीन जगताप, प्रा. प्रियांका पाटील, प्रा. निलोफर खान प्रा. रु पाली येवले यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)