शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

श्रीवर्धन तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 5:45 AM

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका पर्यटनाचा केंद्रबिंदू बनला आहे. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी रस्ते हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, दिघी ते श्रीवर्धन रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाल्याचे निदर्शनास येत आहे.

- संतोष सापतेश्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका पर्यटनाचा केंद्रबिंदू बनला आहे. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी रस्ते हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, दिघी ते श्रीवर्धन रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाल्याचे निदर्शनास येत आहे.दिघी गावाजवळच जंजिरा किल्ला आहे. विविध राज्यांतून पर्यटक जंजिरा बघण्यासाठी येतात. श्रीवर्धन-दिघीअंतर ३० कि.मी.चे आहे. जे पर्यटक श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर, दिवेआगार स्थित मंदिराच्या भेटीसाठी येतात ते आवर्जून जंजिरा किल्ल्याला भेट देतात. दिघीपासून जलवाहतुकीची सोय उपलब्ध असल्याने अवघ्या २० मिनिटांत किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. त्यामुळे पर्यटक श्रीवर्धन, बोर्लीपंचतन, गोनघरफाटा मार्गे कुडगाव ते दिघी प्रवास करणे पसंत करतात; परंतु आजमितीस या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. पुणे, मुंबईमधील पर्यटक रविवार सुट्टीसाठी श्रीवर्धनची निवड करतात. पुणे ते ताम्हणी, माणगाव, साई मार्गे श्रीवर्धन १६८ कि.मी.चे अंतर आहे. मुंबई, पनवेल, पेण, माणगाव, साई मार्गे श्रीवर्धन १९८ कि.मी.चे अंतर आहे. साधारणत: पाच तासांत पर्यटक श्रीवर्धनमध्ये पोहोचतात. श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे येणाऱ्या पर्यटकांना या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.वेळास, कुडगाव, दिघी गावांच्या हद्दीत खड्डेमुरुड, अलिबाग, पेण, रेवदंडा स्थित श्रीवर्धनमधील रहिवाशांना समुद्रमार्गे दिघीत आल्यानंतर दिघी ते श्रीवर्धन रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रचंड त्रास होत आहे. हे ३० कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी जवळपास दीड तास लागत असल्याने श्रीवर्धनमधील नागरिक तसेच बाहेरून येणारे प्रवासी, पर्यटक संताप व्यक्त करत आहेत. वेळास, कुडगाव, दिघी गावांच्या हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वाराला गाडी चालवताना असंख्य अडचणी येत आहेत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ठ करण्यात आला. माणगाव ते वडवली गावाच्या हद्दीपर्यंत महामार्गाचे काम आले आहे. त्यामुळे हे काम पूर्णत्वास कधी जाणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत काम पूर्णत्वास जात नाही, तोपर्यंत कमीत कमी आहे त्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात यावी, जेणेकरून प्रवासी वाहतूक सुरळीत पार पडेल, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.वेळास ते दिघी रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्व स्थानिकांना त्रास होत आहे. आम्ही माणगाव, श्रीवर्धनमधील बांधकाम विभागाला त्या विषयी कळवले आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप काहीच उत्तर आले नाही, तसेच दिघी पोर्टला खड्डे बुजविण्यासाठी कळवले आहे. स्थानिक जनता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.- मधुकर भालदार,ग्रामसेवक,दिघी ग्रामपंचायतदिघी रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. या मार्गावरून प्रवासी वाहतूक नियमित चालते. रस्ता खराब असल्याने त्याचा परिणाम बसच्या क्षमतेवर होत आहे.- राजेंद्र बडे, एसटीचालक,श्रीवर्धन आगारमी प्रत्येक आठवडासुट्टीला माझी दुचाकी घेऊन मुरुडला गावी जातो. वेळास ते दिघी रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत, वेळीच रस्त्याचे काम केले नाही तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.- संदीप गुरव, रहिवासी, मुरुडदिघी हा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे, त्यामुळे तो आमच्या अखत्यारित येत नाही.- श्रीकांत गणगणे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगड