नागोठणे : रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बीट मार्शल तैनात करण्यात आले आहेत. नागोठणे पोलीस ठाणेअंतर्गत पो. निरीक्षक बाळासाहेब दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पोलीस कर्मचारी नेमण्यात आले. ते आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. यामुळे धूमस्वार, मंदिरांच्या परिसरात चाळे करीत मुक्तपणे फिरणारी प्रेमीयुगुले, रोमीओ, उडाणटप्पू तसेच मद्य प्राशन करून सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्यांना निश्चितच चाप बसला असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.बीट मार्शलच्या कर्तव्यदक्षतेचा असाच अनुभव दोन दिवसांपूर्वी येथील प्रभू आळीतील नागरिकांना आला. मंगळारी प्रभू आळीत एका भामट्याने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेला लूटमार होत असून अंगावरील दागिने काढून ठेवा, असे सांगितले. त्याच दरम्यान तेथून जात असलेल्या एका तरु णाला बोलावून तसेच करण्यास सांगितले. त्या दरम्यान ही महिला चपळाईने तेथून निसटली. या प्रकरणी बीट मार्शलला पाचारण केल्यानंतर दोन -तीन मिनिटांतच ते त्या ठिकाणी दाखल झाले आणि तपास सुरू केला.
नागोठणेत बीट मार्शलमुळे रोडरोमीओंना बसलाय चाप
By admin | Published: January 20, 2016 2:05 AM