शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

रोहा-दिवा शटल लवकरच १५ डब्यांची : रेल्वेमंत्र्यांची प्रवाशांना विशेष भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 3:50 AM

रायगड जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित असणाऱ्या ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची नुकतीच भेट घेतली.

अलिबाग - रायगड जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित असणाऱ्या ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची नुकतीच भेट घेतली. त्यामध्ये रोहा-दिवा शटल सेवेच्या फेºया वाढवून त्यांची डब्यांची संख्या १५ करणे, त्याचप्रमाणे अंतर्गत येणाºया स्टेशनमधील फलाटांची लांबी वाढवण्याला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हिरवा कंदील दिला आहे. त्याचप्रमाणे पनेवल रेल्वेस्टेशनला अत्याधुनिक सुविधा देणे, पेण रेल्वेस्टेशनमध्ये लांबपल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा, यालाही त्यांनी मान्यता दिली आहे. रायगडकरांना १५ आॅगस्टच्या पूर्वसंध्येला चांगलीच भेट मिळाल्याचे अधोरेखित होत आहे.केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या भेटीमुळे जिल्ह्यातील रेल्वे संबंधीचे अनेक प्रश्न मार्गी लागले असल्याने त्यांच्या सोबतची भेट सकारात्मक ठरली असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप यांनी पत्रकार परिषदेत दिली. पेण रेल्वेस्टेशनमध्ये लांबपल्ल्यांच्या गाड्यांना प्रवासी भेटत नसल्याचे कारण रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने पुढे केले जात होते. जिल्ह्यात नागरीकरण वाढले आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांची संख्या लक्षणीय झाली असल्याने पेण रेल्वेस्टेशनवर लांबपल्ल्यांच्या गाड्या थांबणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेल्वेमंत्र्याच्या निर्दशनास आणून दिले. प्रवाशांबाबतचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना गोयल यांनी दिल्या असल्याचे धारप यांनी सांगितले.दिवा-रोहा या गाडीवरच प्रवाशांची मदार आहे, त्यामुळे त्या गाड्यांची वाढ होणे गरजेचे असल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले होते. त्यानुसार प्रवासाचा हंगाम संपल्यानंतर दिवा-रोहासाठी एक जादा गाडी देण्याचे गोयल यांनी मान्य केले आहे, त्यामुळे रायगडकरांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.रेल्वे फाटकांवर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात, त्यामुळे रेल्वे फाटक ही संकल्पना रायगड जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यातील २४ ठिकाणांच्या रेल्वे फाटकांवर ओव्हर ब्रिज उभारण्याचे आदेश गोयल यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. पनवेल रेल्वेस्टेशनला उच्च श्रेणीचा दर्जा तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कालावधीत देण्यात आला होता. मात्र, त्या प्रमाणात सोयी-सुविधा पनवेल स्टेशनमध्ये पुरवण्यात आल्या नव्हत्या. आता नव्याने महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र उच्च दर्जाचे स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वातानुकूलित विश्रांतीगृह, तेथील आसन व्यवस्था लवकरच पुरवण्यात येणार आहे. पनवेल स्टेशनमधील दोन ठिकाणी सरकते जिने आणि लिफ्टची सुुविधा २ आॅक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. उर्वरित चार ठिकाणचे सरकते जिने टप्प्याटप्प्याने उभारणार आहेत. पत्रकार परिषदेला अलिबाग तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर, अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, परशुराम म्हात्रे, सतीश लेले, प्रवक्ते मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.रोहा- दिवाला १२ ऐवजी १५ डबेरोहा-दिवा शटल सेवेच्या फेºया वाढवून त्यांची डब्यांची संख्या १५ करण्यात येण्याला रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी दिली असल्याने त्या अंतर्गत येणाºया स्टेशनमधील दिवा, दातिवली, निळजे, नावाडे, पनवेल यासह अन्य फलाटांची लांबी वाढवण्यात येणार आहे. यासाठी तीन कोटी रुपये रेल्वे खर्च करणार आहे.विशेष साहाय्यता निधीसाठी ५० कोटीआपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी विशेष साहाय्यता निधीसाठी ५० कोटी रुपयांची मागणी पालकमंत्री यांनी सरकारकडे केली आहे.पिंजºयांतील मत्स्यपालनावर भरतरुणांच्या हाताला काम देण्यासाठी सरकार जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पिंजºयातील मत्स्यपालन ही नवीन संकल्पना जिल्ह्यात रुजू पाहत आहे. जिल्ह्यातील शेतकºयांची या योजनेतून आर्थिक भरभराट होण्यास मदत मिळणार आहे.पेण रेल्वेस्थानकामधून मिळणार रिटर्न तिकीटपेणवरून शिवाजी टर्मिनलकडे जाण्यासाठी एकेरी प्रवासाचे तिकीट दिले जाते; पंरतु रिटर्न तिकीट दिले जात नव्हते. पेणला सबअर्बन वर्गात गणले जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. तिकीट विभागातील तांत्रिक बदल दुरुस्त करून तीही सुविधा आता रायगडकरांना मिळणार आहे.माथेरानची ट्रेन मिनी गेज आहे, त्यामुळे मुंबईकडे जाताना ब्रॉड गेज ट्रेन आहेत, त्यामुळे प्रवाशांना दोन वेळा तिकीट काढावे लागायचे. त्यामध्ये त्यांचा वेळ खर्च व्हायचा यावर उपाय म्हणून आता माथेरानच्या तिकीट खिडकीवर लवकरच सर्वच लोकलचे तिकीट १ जानेवारी २०१९ पासून उपलब्ध करून दिले जाणार आहे.खारबंदिस्तीच्या कामांना ६० कोटी रुपयेरायगड जिल्ह्यातील खारबंदिस्तीचा प्रश्न फार गंभीर आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये एकाही पालकमंत्र्यांनी सभागृहात कपातसूचना मांडलेली नाही. त्यामुळे यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करण्यात अडथळा येत होताा; परंतु आता जिल्ह्यातील खारबंदिस्तीच्या कामांना तब्बल ६० कोटी रुपये मिळणार आहेत. याचा फायदा अलिबाग, पेण तालुक्यांना सर्वाधिक प्रमाणात होणार आहे. पनवेल तालुक्यातील केळवणे आणि मोठी जुई हे सिडकोच्या अखत्यारीत असल्याने तेथे गेलेल्या खारबंदिस्तीसाठी सिडकोने पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. ज्या गावातील खांडी जाऊन शेत उद्ध्वस्त झाले आहेत. त्या शेतकºयांना अन्न सुरक्षा कायद्याचे कवच देण्यात येणार आहे.जिल्ह्यात उभारणार फोम बँकरायगड जिल्हा हा उद्योगांचा जिल्हा आहे, येथे मोठ्या प्रमाणात कंपन्यांनी आपले जाळे विस्तारलेले आहे. त्यामध्ये केमिकल कंपन्यांचा अधिक भरणा आहे. काही दिवसांपूर्वीच रोहे एमआयडीसीमधील कंपनीमध्ये स्फोट झाला होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याबरोबरच फोमची आवश्यकता असते. जिल्ह्यात मध्यवर्ती ठकाणी फोम बँक उभारण्यात येणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRaigadरायगड