रोहा-पुणे एसटी बिघाडामुळे बंद

By admin | Published: October 5, 2015 11:57 PM2015-10-05T23:57:05+5:302015-10-05T23:57:05+5:30

ताम्हिणी मार्गे पुण्याकडे सकाळी सहा वाजता जाणारी रोहा आगाराची बस कोलाड (हेटवणे) गावानजीक मध्येच बंद पडली. यामुळे तब्बल दोन तास प्रवाशांना ताटकळत राहावे लागल्याने

Roha-Pune ST is due to failure | रोहा-पुणे एसटी बिघाडामुळे बंद

रोहा-पुणे एसटी बिघाडामुळे बंद

Next

धाटाव : ताम्हिणी मार्गे पुण्याकडे सकाळी सहा वाजता जाणारी रोहा आगाराची बस कोलाड (हेटवणे) गावानजीक मध्येच बंद पडली. यामुळे तब्बल दोन तास प्रवाशांना ताटकळत राहावे लागल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवारी सकाळी या बसने पुण्यात कामावर जाणाऱ्यांना बरोबर १०:३० पर्यंत पोहोचता येते. मात्र रोहा बस स्थानकातून सुटलेली बस अचानक कोलाड नजीक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रोहा आगारातून दुसरी बस पाठविण्यात आली. मात्र दुसरी बस येईपर्यंत तब्बल दोन तास वाट पहावी लागल्याने प्रवासी संतप्त झाले. मागील दोन ते तीन सोमवारपासून बस बंद पडण्याचे प्रकार घडत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.(वार्ताहर)

Web Title: Roha-Pune ST is due to failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.