उरणमध्ये केगाव शाळेचे छप्पर पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 04:06 AM2018-07-08T04:06:34+5:302018-07-08T04:07:10+5:30
मुसळधार पावसाने उरण तालुक्याला शनिवारी झोडपले. शहरात अनेक भागात पावसाचे पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे,
उरण - मुसळधार पावसाने उरण तालुक्याला शनिवारी झोडपले. शहरात अनेक भागात पावसाचे पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचे कौलारू छत कोसळल्याची घटना घडली आहे. यात जीवितहानी झाली नसली तरी विद्यार्थी, पालक वर्गात भीतीचे वातावरण आहे.
पावसाच्या दमदार आगमनाने शेतकरी सुखावला असून नांगरणी, भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे तालुक्यात काही भागातील भात शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच सखल भागात, रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.
उरण तालुक्याला पाणीपुरवठा होणारे रानसई धरण भरून वाहू लागल्याने धरणातील पाण्याचा आनंद लुटण्यासाठी तरु णाई, पर्यटकांनी गर्दी केल्याचेही पहायला मिळाले.
पावसामुळे शहरातील शाळा, कॉलेजात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच चाकरमान्यांचे, कामगारवर्गाचे हाल झाले. संततधार पडणाºया पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले.