श्रीवर्धन समुद्रकिनारी ‘केंड’ची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:53 PM2019-07-11T23:53:42+5:302019-07-11T23:54:03+5:30

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल : मासा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

Rumor of 'Kend' fish on Shrivardhan beach | श्रीवर्धन समुद्रकिनारी ‘केंड’ची अफवा

श्रीवर्धन समुद्रकिनारी ‘केंड’ची अफवा

Next

संतोष सापते 


श्रीवर्धन : बुधवारी श्रीवर्धन समुद्रकिनारी केंड जातीचा मासा मृत अवस्थेत असल्याचे छायाचित्रे सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे समुद्रकिनारी हा मासा पाहण्यासाठी गर्दी जमली. मात्र, श्रीवर्धन येथील वी नेचर फ्रेंड संस्थेचे सभासद, प्राणिमित्र शैलेश ठाकूर यांनी श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर सकाळी ११ ते १२:३० या कालावधीत सर्वत्र भ्रमंती केली; परंतु कुठे ही केंड जातीचा मासा मृतावस्थेत पडल्याचे आढळले नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे ही के वळ अफवा असल्याचे स्पष्ट के ले.


यावर्षी जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्याबरोबर समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे समुद्रातील जैवविविधतेचा प्रत्यय समुद्रकिनाºयालगतच्या श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग, दिवेआगार या विविध गावांना आला. दिवेआगारच्या समुद्रकिनारी यावर्षी भरती व ओहोटीप्रसंगी मोठ्या प्रमाणात शिंपले जमा झाले. तर दिवेआगार व मुरुड समुद्रकिनारी सहा ते आठ फूट खोल पाण्यात मासे मृत अवस्थेत आढळले. श्रीवर्धन किनाºयावर जवळपास ८० किलो वजनाचे आफ्रिकेतील ग्रीन टरटल जातीचे कासव प्राणिमित्रांनी पूर्ववत समुद्रात सोडले. या घटनांचा क्रम घडत असताना बुधवारी श्रीवर्धन समुद्रकिनारी केंड जातीचा मासा मृतावस्थेत असल्याचे छायाचित्र सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.


या वृत्ताची माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने श्रीवर्धन येथील वी नेचर फ्रेंड संस्थेचे सभासद प्राणिमित्र शैलेश ठाकूर यांच्या समवेत श्रीवर्धनच्या समुद्रकिनाºयावर भ्रमंती केली; परंतु कुठेही केंड जातीचा
मासा मृतावस्थेत पडल्याचे आढळले नाही.

असा असतो केंड मासा
केंड जातीच्या माशाविषयी माहिती मिळवली असता छायाचित्रात दर्शवलेला मासा हा ‘केंड’च असून त्याच्या शरीराची रचना तंतोतंत बरोबर आहे. मासेमारी करणाºया व्यावसायिकाकडून केंडची माहिती घेतली असता केंडचे वास्तव्य श्रीवर्धनच्या समुद्रात असल्याचे समजले; परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणारी त्याची लांबी व रुंदीचा विपर्यास केल्याचे दिसून आले. सर्वसाधारण माशाप्रमाणे केंडचे आकारमान असते. छायाचित्रात केंड मोठा दिसत असेल; परंतु ते सत्य नाही. केंड हे ग्रामीण भागात वापरले जाणारे नाव आहे. विज्ञानाच्या कोणत्याही पुस्तकात जलचर प्राण्यांच्या मत्स्य विभागात ‘केंड’ हे नाव निर्देशित केलेले नाही.

Web Title: Rumor of 'Kend' fish on Shrivardhan beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.