दहा रु पयांच्या नाण्याबाबत अफवांचे पेव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 06:37 AM2017-08-09T06:37:00+5:302017-08-09T06:37:00+5:30

रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या १० रु पयांच्या नाण्यांबाबत उलटसुलट अफवा पसरविल्या जात असल्याने शहरासह विभागातील नागरिक संभ्रमात आहेत. काही बँका सुद्धा ही नाणी घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने बँकांचे या मागचे नक्की धोरण तरी काय हे स्पष्ट होत नसल्याने त्या निमित्ताने अफवेला आणखी बळ मिळत आहे.

 Rumors about rupees ten rupees | दहा रु पयांच्या नाण्याबाबत अफवांचे पेव  

दहा रु पयांच्या नाण्याबाबत अफवांचे पेव  

Next

नागोठणे : रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या १० रु पयांच्या नाण्यांबाबत उलटसुलट अफवा पसरविल्या जात असल्याने शहरासह विभागातील नागरिक संभ्रमात आहेत. काही बँका सुद्धा ही नाणी घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने बँकांचे या मागचे नक्की धोरण तरी काय हे स्पष्ट होत नसल्याने त्या निमित्ताने अफवेला आणखी बळ मिळत आहे. शासनाने तरी आपले धोरण जाहीर करावे, अशी मागणी केली जात आहे.
दहा रु पयांच्या नोटांचे व्यवहार होताना कालांतराने त्या खराब होत असल्याने १० रु पये कायमस्वरूपी राहण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नोटांबरोबर नाणी सुद्धा चलनात आणली आहेत. बाजारात सध्या या नाण्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने आपल्याकडे आलेले नाणे, खरेदीच्या निमित्ताने दुकानदाराला द्यायचा मार्ग गिºहाईकाने पत्करल्याने पर्यायाने ही नाणी दुकानांतील गल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात खणखणत आहेत. आपल्याकडची नाणी बचतीच्या माध्यमातून पतसंस्थांकडे देण्याचा पर्याय सुद्धा वाढल्याने पतसंस्थांकडे सुद्धा ती मोठ्या प्रमाणात वाढावयास प्रारंभ झाला. आपल्याकडे जमा झालेली नाणी आपले खाते असलेल्या सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बँकांत जमा करावयास सुरु वात केल्याने आपल्याकडे आता हे ओझे नको म्हणून काही सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांनी शक्यतो ती न स्वीकारण्याचा मार्ग पत्करल्याने सामान्य नागरिक ते बँक अशी मालिका निर्माण होऊन बँका नाणी स्वीकारत नसल्याने हे नाणे बंद झाले असा समज काहींनी करून घेतला आणि उलटसुलट अफवांनी जोर धरला आहे. याबाबत मागोवा घेतला असता, बँका आमच्याकडून ही नाणी घेत नसल्याने आम्ही ती खातेदारांकडून तसेच ग्राहकांकडून ती घेत नाही असे दबक्या आवाजात ऐकावयास येऊ लागल्या आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नका
येथील काही बँका तसेच व्यापारी संघटनेकडून या नाण्यांबाबत मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नागोठणे शाखेतील स्टेट बँक आॅफ इंडियाचे कु मुदा पांडा यांनीदहा रु पयांची नाणी आजही आम्ही आमच्या शाखेत स्वीकारत आहोत.
आमच्या शाखेत खाते नसतानाही काही जण मोठ्या प्रमाणात जमा झालेली नाणी आमच्याकडे देण्याचा प्रयत्न करीत असल्याने काही वेळेला आम्ही ते घेण्याचे टाळत असतो. १० रु पयांची नाणी आजही चलनात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

येथील पतसंस्था त्यांच्याकडे असलेली नाणी आमच्याकडे जमा करण्यासाठी आणत असतात व त्याची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त रु पयांची नाणी दररोज आणली, तर ती वेळेत मोजणे शक्य होत नसल्याने ती आम्ही घेत नसलो तरी दोन - चार हजार रु पयांची नाणी आम्ही निश्चितपणे स्वीकारत असतो. आम्ही १० रु पयांची नाणी घेतच नाही असा होत असलेला गोंगाट सपशेल खोटा आहे.
- सुनीता वढावकर, शाखाधिकारी,
रायगड जि. मध्यवर्ती बँक, नागोठणे शाखा
दहा रु पयांची नाणी आजही अधिकृतपणे चलनात आहेत व ती घेणे टाळल्यास संबंधितांवर गुन्हा सुद्धा होऊ शकतो. माझ्या माहितीप्रमाणे नागोठण्यातील सर्व लहान-मोठे दुकानदार ही नाणी स्वीकारत आहेत. आता होत असलेल्या अफवांमुळे काही जण ती घेण्यास टाळाटाळ करीत असले, तर ही नाणी बिनदिक्कतपणे स्वीकारावी याबाबत आजच पत्र काढून त्यांना सूचना देणार आहे.
- प्रकाश जैन, अध्यक्ष, व्यापारी संघटना

Web Title:  Rumors about rupees ten rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.