उरण : जेएनपीटीने जासई-दास्तानफाटा दरम्यान सुरू केलेल्या ३० कोटी खर्चाच्या शिवस्मारकाचे काम अपूर्ण आहे. मात्र, सवंग प्रसिद्धीसाठी घाईघाईने ३ फेब्रुवारी रोजी जेएनपीटीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मारकाच्या उद्घाटनाचा घाट सुरू आहे.उद्घाटनाच्या आयोजनामुळे स्मारकाचे काम अत्यंत घाईघाईत केले जात असून, कामाचा दर्जाही घसरत आहे. त्यामुळे अपूर्ण स्मारकाच्या उद्घाटनाचा कार्यक्र म रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी जेएनपीटी अध्यक्षांकडे तक्रारीद्वारे केलीआहे.जेएनपीटीने उरण तालुक्यातील जासई-दास्तानफाटा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थांच्या भेटीवर आधारित शिवस्मारक उभारण्याचे काम मागील वर्षापासून सुरू केले आहे. सुमारे ३० कोटी खर्चून २२ मीटर उंचीचे हे स्मारक जेएनपीटीच्या मालकीच्या दोन एकर जागेत उभारण्यात येत आहे. स्मारक परिसरात आर्ट गॅलरी, शिवकालीन वस्तूंचे म्युझियम, मिनी एमपी थिएटर, कॅफेटरिया, फाउंटन गार्डन आदी सुविधाही उभारण्यात येत आहेत. स्मारकाचे बांधकाम फेब्रुवारी २०१९ मध्ये पूर्ण करण्याची मुदत आहे. मात्र, स्मारकाचे बरेचसे काम अपूर्ण असतानाच शिवस्मारकाच्या उद्घाटनाचा घाट घातला आहे.३ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करण्याची तारीखही निश्चित केली आहे. त्यासाठी जेएनपीटीने उद्घाटनाच्या कार्यक्र माची जोरदार तयारीही चालविली असल्याची माहिती जेएनपीटी अधिकाऱ्यांनी दिली.उरण तालुक्यातील जासई-दास्तानफाटा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थांच्या भेटीवर आधारित शिवस्मारकस्मारक परिसरात आर्ट गॅलरी, शिवकालीन वस्तूंचे म्युझियम, मिनी एमपी थिएटर, कॅफेटरिया, फाउंटन गार्डन आदी सुविधा.अपूर्ण काम पूर्ण होण्यास आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. घाईघाईने केलेल्या कामामुळे दुर्घटना होण्याची शक्यता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली.अपूर्णावस्थेतील शिवस्मारकस्मारकाचे अपूर्ण काम असताना सवंग प्रसिद्धीसाठी जेएनपीटीने स्मारकाच्या उद्घाटनाचा घाट घातल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांच्याकडे तक्र ारीतून केला आहे. स्मारकाच्या उद्घाटनाचा कार्यक्र म रद्द करण्यात यावा, तसेच स्मारकाचे उद्घाटन काम पूर्ण झाल्यावरच करण्यात यावे, अशी मागणीही प्रशांत पाटील यांनी केली असून न्यायालयात दाद मागणार आहेत.
शिवस्मारकाच्या उद्घाटनाची घाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 12:14 AM