उरण : जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्यांना रशियाच्या शिष्टमंडळाने शनिवारी भेट दिली. ऐतिहासिक काळ्या पाषाणात कोरलेल्या जागतिक कीर्तीच्या एलिफंटा लेण्यांना शनिवारी (२३) रशियाच्या शिष्टमंडळाने शनिवारी भेट दिली. यावेळी घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले.
एलिफंटा बेटावर असलेल्या लेण्यांमधील शिवाच्या अनेक कलाकृती, रुपे पाषाणात कोरण्यात आली आहेत. या कलाकृती, लेण्यांची आणि बेटावरील विकासाची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर रशियाच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य उपस्थित होते.