रोहा : रोहा-माणगाव एसटी बस कोलाड रस्त्यावरून जात असताना एका दुचाकीला कट मारल्याचा गैरसमज करून फिल्मी स्टाइलने भर रस्त्यात एसटीसमोर दुचाकी आडवी घालून एसटीमधला जॅक काढून चालकाला मारण्याचा प्रयत्न केल्याची पोलिसांत करण्यात आली आहे. एस.टी. बस क्र. एम.एच.0६ एस.८४८१ मधून चालक व वाहक प्रवासी घेऊन रोहा ते माणगाव असे जात असताना किल्ला गावचे हद्दीत आले असता मोटार सायकल क्र . एम.एच.0६ बीएस ४१३६ ही आरोपी रा.आंबेवाडी, ता.रोहा यांनी एस.टी.बसला कट मारली म्हणून मनात राग धरून एस.टी. बसचे समोर मोटार सायकल आडवी घालून रस्ता अडवून एसटी चालक हे सरकारी ड्युटी करीत असताना त्यांना शिवीगाळ करून व एस.टी. बसमधील जॅक काढून घेऊन चालकास मारण्याचा प्रयत्न केला व गणवेशाच्या उजव्या खिशात असलेला मोबाइल व एस.टी. बसचा रोजनामा खेचून काढून घेऊन गणवेशाच्या शर्टाचा खिसा फाडून नुकसान केल्याची तक्र ार रोहा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास मुंडे व मारखंडे हे करीत आहेत.
एस. टी. चालकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 2:50 AM