नांदगाव/ मुरुड : मुरुड शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. सगळ्या ठिकाणच्या रस्ते दुरुस्तीचे काम करणारे या विभागातील कार्यालय मोडकळीस आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त के ले जात आहे.मुख्य शहरात असणाऱ्या या कार्यालयातील दरवाजे तुटलेले आहेत, खिडक्यांची तावदाने तुटून काही खिडक्या लोंबकळत आहेत. इमारतीचा स्लॅब निघाला असून, लोखंडी सळ्या स्पष्टपणे धोक्याची सूचना देत आहेत. तहसील कार्यालयाची इमारत, तसेच दिवाणी न्यायालयाच्या इमारती नुकत्याच दुरु स्त करण्यात आलेल्या आहेत. मग स्वत: ज्या जागेत बसतात, त्या इमारतीची दुरुस्ती गेल्या कित्येक वर्षांत करण्यात आलेली नाही. याचे नागरिकांना आश्चर्य वाटत आहे.गेल्या अनेक वर्षांत मुरु ड येथील बांधकाम खात्याची इमारत दुरु स्ती करण्याची वाट पाहत आहे. ही इमारत लवकरात लवकर दुरु स्त होऊन हिला गत वैभव प्राप्त व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)
सा.बां. कार्यालयाची दुरवस्था
By admin | Published: March 23, 2017 1:39 AM