कर्जतमध्ये सफाई कामगारांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 06:46 AM2018-04-04T06:46:54+5:302018-04-04T06:46:54+5:30
कर्जत नगरपरिषदेने साफसफाई व घंटागाडीचा ठेका चार कंपन्यांना दिला आहे. या सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात ४२ कर्मचारी होते. मुख्याधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
कर्जत - कर्जत नगरपरिषदेने साफसफाई व घंटागाडीचा ठेका चार कंपन्यांना दिला आहे. या सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात ४२ कर्मचारी होते. मुख्याधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
नगरपरिषदेमध्ये व घंटागाडीवर अनेक वर्षांपासून सफाई कामगार काम करीत आहेत. कायमस्वरूपी कामगारांना देण्यात येणाºया सेवा-सुविधा द्याव्या लागू नये म्हणून नगरपरिषदेकडून या कामगारांना कंत्राटी पध्दतीने राबवले जात आहे.
कामगारांचे शोषण होऊ नये म्हणून शासनाने वेळोवेळी किमान वेतन देणे बंधनकारक असल्याचे आदेश पारित केले आहेत असे असताना कर्जत नगरपरिषदेकडून कामगारांना अत्यल्प वेतन दिले जाते आहे. याशिवाय कर्मचाºयांना कायद्यानुसार देय असणारे ई. एस. आय. आणि कर्मचारी भविष्य निधी कर्मचाºयांच्या खात्यामध्ये जमा केला जात नाही, कर्मचाºयांचे मासिक वेतन धनादेशाद्वारे केले जात नाही, ठेकेदारांकडून गणवेश, रेनकोट तसेच सुरक्षेची साधने मास्क, हॅण्डग्लोज पुरवली जात नाही. तसेच साफसफाईकरिता आवश्यक असणारी साधनेही दिली जात नाहीत.
तसेच २०१७ चा दिवाळी बोनस सुद्धा ठेकेदारांनी कामगारांना दिलेला नाही, नगरपरिषदेच्या अखत्यारीतील ठेकेदार अशा पध्दतीने कर्मचाºयांची पिळवणूक करत आहे. सफाई कर्मचाºयांनी म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्यावतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
याप्रसंगी म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस अनिल जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, कामगार अनंत गायकवाड, स्वप्निल सोनावणे, राहुल गायकवाड, मदन हिरे, अनिल शिंदे, उमेश गायकवाड उपस्थित होते. त्यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. काही मागण्या मुख्याधिकारी कोकरे यांनी तत्काळ सोडविण्यात येतील, असे सांगितले.
कामगारांचे शोषण होऊ नये म्हणून किमान वेतन देणे बंधनकारक असल्याचे आदेश पारित आहेत.
- अनिल जाधव, सरचिटणीस, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन
एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडबाबत काही बाबी अपूर्ण असतील तर त्या तत्काळ पूर्तता करून त्यांना न्याय देण्यात येईल.
- रामदास कोकरे, मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद