आंबोलीत पुन्हा भगवा

By admin | Published: December 30, 2016 03:58 AM2016-12-30T03:58:57+5:302016-12-30T03:58:57+5:30

मुरु ड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबोलीच्या सरपंचपदी मनोज कमाने विराजमान झाले होते. मात्र कामने यांना तीन अपत्य असल्याने त्यांचे सरपंचपद व सदस्यपद गेले.

Saffron again in Ambalit | आंबोलीत पुन्हा भगवा

आंबोलीत पुन्हा भगवा

Next

आगरदांडा : मुरु ड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबोलीच्या सरपंचपदी मनोज कमाने विराजमान झाले होते. मात्र कामने यांना तीन अपत्य असल्याने त्यांचे सरपंचपद व सदस्यपद गेले. यामुळे गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्या आदेशानुसार आंबोली येथील रिक्त झालेल्या सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. अध्यासी अधिकारी रमेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय आंबोली येथे विशेष सभा बोलाविण्यात आली. यावेळी शिवसेनेचे चार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य उपस्थित होते. आंबोली ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे.
सरपंचपद हे सर्वसाधारण वर्गासाठी असल्याने या पदासाठी
एकूण चार नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. त्यापैकी शिवसेनेकडून दोन तर राष्ट्रवादीकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. प्रत्येक पक्षाकडून एकएक उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. सरपंचपदासाठी शिवसेनेकडून नरेंद्र म्हात्रे तर राष्ट्रवादीकडून सुचिता रोटकर रिंगणात उभे होते. ही निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने झाली. त्यामधील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र म्हात्रे यांना ४ मते मिळाली तर राष्ट्रवादीकडून सुचिता रोटकर यांनाही ४ मते मिळल्याने टाय अवस्था झाली होती. अध्यासी अधिकारी रमेश म्हात्रे यांनी त्याच गावातील हर्षल खंडागळे या लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढली. त्या चिठ्ठीव्दारे आंबोली सरपंचपदासाठी नरेंद्र लक्ष्मण म्हात्रे हे निवडून आल्याचे अध्यासी अधिकारी रमेश म्हात्रे यांनी जाहीर केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुचिता रोटकर, चेतना मुंगळे, अनिता कमाने, नरेंद्र म्हात्रे, संदीप गायकर, सादीक कबले, योगिता मिणमिणे आदींसह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Saffron again in Ambalit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.