नेरळ : धुवाधार कोसळणाºया पावसामुळे पोशीर-माले रस्ता वाहून गेला असून विद्यार्थी, प्रवासी आणि वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्ता वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीचे पंचनामे करून भरपाई द्या तरच रस्ता तयार करा, अशी आक्रमक भूमिका शेतकºयांनी घेतली आहे.३ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत पोशीर-माले रस्त्यावरील परिसर जलमय झाला होता. त्या वेळी पावसाचा जोरदार तडाखा बसून माले-पोशीर रस्ता दहा मीटर अंतरापर्यंत वाहून गेला आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण बंद आहे. हा रस्ता वाहून गेल्याने रस्त्याखालील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरवर्षी हा रस्ता खचतो आणि शेतीचे प्रचंड नुकसान होते. दरवर्षी नुकसान होऊनही येथील शेतकºयांना भरपाई मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.या ठिकाणी बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी केली आहे; परंतु पहिल्यांदा नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करून सर्व शेतकºयांना नुकसानभरपाई द्या; नंतर रस्त्याचे काम करा, अशी भूमिका येथील शेतकºयांनी घेतली आहे. तसेच रस्ता खचल्याने माले, आसे, फराटापाडा, आर्डे येथील विद्यार्थ्यांना पोशीर शाळेत येताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच प्रवासी वाहनचालकही हैराण झाले आहेत, वाहनचालकांना पोशीर येथे येण्यासाठी कळंबवरून वळसा घेऊन यावे लागते आहे. त्यामुळे शेतकºयांना नुकसानभरपाई देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.दरवर्षी पुराच्या पाण्याने रस्ता खचून माती, दगड शेतात येऊन शेतीचे नुकसान होत आहे; परंतु कोणत्याही प्रकारे नुकसानभरपाई दिली जात नसल्याने आमचे प्रचंड नुकसान होत आहे. या वर्षी तर पूर्ण शेतात मातीचा भराव आणि दगड येऊन पडले आहेत, त्यामुळे पहिल्यांदा शेतीच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्या; नंतर रस्ता तयार करा, अशी आमची ठाम भूमिका आहे.- रियाज बोंबे, शेतकरी, चिकनपाडाशेतकºयांची मागणीही रास्त आहे, दरवर्षी नुकसान होऊनही त्यांना भरपाई मिळत नाही, त्यामुळे शासनाने शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच रस्ता खचल्याने विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक, प्रवासी, वाहनचालकांचेही हाल होत आहेत, यामुळे महसूल विभागाने शेतकºयांची मागणी पूर्ण करावी आणि रस्त्याचे काम सुरू करावे.- हरिश्चंद्र वेहले, ग्रामस्थ, मालेपोशीर-माले रस्त्यावरील चिकनपाडा येथे रस्ता वाहून गेला आहे. त्या ठिकाणी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना जागेवर जाऊन पाहणी करून पंचनामा करण्यास सांगितले आहे. लवकरच नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे केले जातील.- अविनाश कोष्टी, तहसीदार, कर्जत
नेरळ-माले रस्ता गेला वाहून; प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 11:43 PM