जंजिरा किल्ल्यावर फडकवला भगवा
By Admin | Published: April 1, 2016 03:07 AM2016-04-01T03:07:55+5:302016-04-01T03:07:55+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला आणि महाराष्ट्राची कीर्ती जगभर झाली. सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्ग जागृतीसाठी झटणाऱ्या संस्थेने स्वराज्य संकल्प दिन
जंजिरा : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला आणि महाराष्ट्राची कीर्ती जगभर झाली. सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्ग जागृतीसाठी झटणाऱ्या संस्थेने स्वराज्य संकल्प दिन महाराष्ट्रातील ३०० किल्ल्यांवर एकाचवेळी भगवा फडकावून साजरी करण्याची मोहीम आखली. त्याप्रमाणे बुधवारी सायंकाळी या संस्थेच्या मावळ्यांनी जंजिरा किल्ल्यावर भगवा फडकवला.
सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धन विभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्प दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ३०० किल्ल्यांवर एकाचवेळी भगवा ध्वज फडकवण्याची मोहीम आखली. शिवरायांच्या राज्याभिषेकापासून शिवजयंती सर्वत्र साजरी होते. मात्र स्वराज्याचा संकल्प ज्या दिवशी छत्रपतींनी सोडला त्या दिवसाचे भान राखण्याचा हा आगळावेगळा उपक्र म सर्व शिवभक्तांना सुखावणारा आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे चाकण विभागाचे अध्यक्ष प्रतीक जाधव, जयंत टोपे, जयदेव कोकणे, रोहित कोंडवळ आदी मोजक्या मावळ्यांसह पद्मदुर्ग व जंजिरा किल्ल्यावर योजनेप्रमाणे भगवा ध्वज घेवून आले. पद्मदुर्ग आणि जंजिरा किल्ल्यांवर ठरल्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत सर्व मावळे ध्वजस्तंभांजवळ भगवा फडकावून उभे राहिले आणि ही मोहीम पूर्ण केली.(वार्ताहर)