महाडची सायली लष्करी वैद्यकीय सेवेत रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:56 AM2018-07-11T01:56:46+5:302018-07-11T01:57:12+5:30
भारतीय लष्काराच्या आर्मड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसमध्ये महाडची डॉ. सायली कंक लेफ्टनंट म्हणून रु जू झाली आहे.
महाड : भारतीय लष्काराच्या आर्मड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसमध्ये महाडची डॉ. सायली कंक लेफ्टनंट म्हणून रु जू झाली आहे.
कुलाबा मुंबई येथील आयएनएचएस अश्विनी या लष्करी तळावर तिची नियुक्ती करण्यात आली आहे. लष्करी वैद्यकीय सेवेमध्ये दाखल होणारी डॉ. सायली रायगड जिल्ह्यातील पहिलीच तरुणी ठरली आहे.
काकरतळे, महाड येथील आकांक्षा अपार्टमेंटमधील रहिवासी असलेल्या डॉ. सायलीने आपले माध्यमिक शिक्षण नवयुग विद्यापीठ ट्रस्टमधून पूर्ण कले. उच्च माध्यमिक शिक्षण तिने पुण्यात घेतले. तर ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले.
सर जे. जे. रु ग्णालयातून एम.डी. करीत असतानाच तिचे आर्मड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनची परीक्षा दिली आणि त्यात यशस्वी होऊन, मार्च २०१८च्या बॅचची अधिकारी म्हणून भारतीय लष्करात दाखल झाली आहे.