आठ दिवसांनंतर सापडला खलाशाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 02:50 AM2018-07-21T02:50:41+5:302018-07-21T02:50:48+5:30
खवळलेल्या समुद्रात १२ जुलै रोजी मुरुड तालुक्यातील बोर्ली कोळीवाड्यातील ज्ञानराज ही बोट सापडून बुडाल्याने बेपत्ता झालेला नाखवा (चालक) गणेश डोंबे (रा. बोर्ली) याचा मृतदेह नांदगाव समुद्रकिनारी आठ दिवसांनी सापडला.
मुरुड जंजिरा : खवळलेल्या समुद्रात १२ जुलै रोजी मुरुड तालुक्यातील बोर्ली कोळीवाड्यातील ज्ञानराज ही बोट सापडून बुडाल्याने बेपत्ता झालेला नाखवा (चालक) गणेश डोंबे (रा. बोर्ली) याचा मृतदेह नांदगाव समुद्रकिनारी आठ दिवसांनी सापडला.
बोट खवळलेला समुद्र, लाटा व वादळी पावसाच्या तडाख्यात सापडून भरसमुद्रात बुडाली. त्या बोटीवरील सहा खलाशांपैकी पाच जण पोहून व दुसऱ्या बोटीने साहाय्य केल्यामुळे वाचले होते; परंतु बोट बुडताना केबिनमध्ये अडकलेला नाखवा (चालक) गणेश डोंबे वाचू शकला नव्हता. तो बेपत्ता झाल्याची तक्र ारही त्याच्या नातेवाइकांनी दिली होती. गुरुवारी नांदगावच्या समुद्रकिनारी असलेल्या तीर्थवणे येथील खडकात पाण्याने वाहून आलेला मृतदेह स्थानिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी मुरुड पोलिसांना या बाबत कळवल्यावर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे.