उरण : उरण तालुक्यातील आवरे गावातील शेतकरी कुळांकडे असणारी सुमारे २५४ एकर शेतजमीन या जमिनीचे मूळ मालक असणाºया एका सावकाराने शासकीय अधिकाºयांच्या संगनमताने परस्पर विकून टाकली आहे. गरीब शेतकºयांची पिकती जमीनच विकली गेल्याने अनेक शेतकरी कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. या अन्यायाविरोधात फसवणूक झालेल्या शेतकºयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आवरे गावातील अनेक शेतकºयांकडे स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेकडो एकर जमीन कसवणुकीसाठी आहे. मात्र, या जमिनीचा मूळ मालक हा उरणस्थित सावकार आहे. कूळ वहिवाटीखाली आवरे गावातील शेतकरी ही जमीन कसत आहेत. आपल्या ताबे कब्जात असणाºया जमिनीचे आपणच मालक आहोत या भ्रमात असणाºया शेतकºयांना शासकीय अधिकाºयांच्या संगनमताने सावकाराने या जमिनींंचा परस्पर सौदा केला आहे. त्याने या कसवणूकदार शेतकºयांच्या जमिनी १२ वर्षांपूर्वीच एसईझेडला विकून टाकल्या. आपल्या जमिनी विकल्या गेल्याची कोणतीही माहिती या गरीब शेतकºयांना नव्हती. विशेष म्हणजे सावकाराचे हप्ते भरून अधिकृत संरक्षित कूळ असलेल्या शेतकºयांच्या जमिनीही या व्यवहारात विकल्या गेल्या आहेत. शेतकºयांना कंगाल करणाºया या व्यवहारासाठी तत्कालीन भूसंपादन अधिकाºयाचा सहभाग मोठा आहे. महामुंबई सेझच्या जमीन संपादनास शेतकºयांनी घेतलेल्या हरकतींना केराची टोपली दाखवून शेतकºयांच्या हक्काच्या जमिनीचे एसईझेडसाठी संपादन करून घेतल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.
२००८ साली या बाधित शेतकºयांनी या अन्यायाविरोधात उपोषण करून न्याय मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना थातुरमातुर आश्वासने देऊन वाटेला लावल्याचा आरोप या शेतकºयांनी केला आहे. आपल्या ताब्यातील वडिलोपार्जित जमिनी वाचविण्यासाठी आता या शेतकºयांनी ऐपतीप्रमाणे वर्गणी गोळा करून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून न्यायासाठी लढा सुरू केला आहे.