खोट्या कागदपत्रांद्वारे जमीन विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 02:25 AM2019-12-28T02:25:47+5:302019-12-28T02:25:55+5:30

उरण पोलिसांत गुन्हा दाखल : पोलिसांच्या भूमिकेने भूमाफियांना बसला दणका

Sale of land by false documents | खोट्या कागदपत्रांद्वारे जमीन विक्री

खोट्या कागदपत्रांद्वारे जमीन विक्री

googlenewsNext

अलिबाग : उरण आणि पनवेल तालुक्यात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. या परिसरातील जमिनींचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जमिनीच्या व्यवहारात शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसवणूक होण्याचेही प्रमाण वाढले आहे. मात्र, उरण तालुक्यातील एका शेतकºयाने अक्कल हुशारीने फसवणूक करणाºयाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करून स्वस्तात जमीन लाटणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी योग्य भूमिका घेतल्याने जमीन बळकावणाºयांना कडवा संदेश देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते.

उरण तालुक्यातील मौजे मोठी जुई येथील हिराजी कृष्णा पाटील, असे शेतकºयाचे नाव आहे. ते निवृत्त शिक्षक आहेत. हिराजी पाटील यांची जमीन आहे. या जमिनीच्या विक्र ी संदर्भात अशोक केजरीवाल (गुजरात) यांनी २००६ साली साठेकरार करून जमीन खरेदी करण्याच्या संदर्भात व्यवहार केला होता. साठेकरारानंतर कुळकायद्याच्या परवानगीबाबत संबंधित नऊ शेतकºयांच्या सह्या घेतल्या होत्या. जमिनीच्या व्यवहारापोटी सात लाख दोन हजार रुपये किंमत ठरली होती. ठरलेल्या किमतीच्या मोबदल्यापोटी तीन लाख ५१ हजार शेतकºयांना दिले होते; परंतु उर्वरित व्यवहार पूर्ण करण्यास केजरीवाल यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर २०१६ साली अशोक केजरीवाल यांच्या वतीने पेण येथील अभिजीत पाटील यांनी व्यवहार पूर्ण करण्यासंदर्भात नोटीस पाठविली होती. मात्र, व्यवहार पूर्ण करण्यात आला नाही. हिराजी पाटील यांचा पुतण्या संतोष पाटील यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची वारसनोंद करण्याबाबतचा अर्ज जुईचे तलाठी यांच्याकडे दिला होता. याबाबतची नोंद तलाठी करत नसल्याचा जाब विचारला असता, तुमच्या जमिनीचे खरेदीखत करण्यात आले आहे. सातबाराही तयार केला आहे. मंजुरीकरिता मंडळ अधिकाºयांकडे दाखल केला आहे. त्यामुळे तुम्हाला हरकत घ्यायची असेल तर तहसीलदार किंवा मंडळ अधिकाºयांकडे घ्या, असे तलाठ्याने सांगितले. सदरचे खरेदीखत अशोक केजरीवाल यांनी परस्पर केल्याचे कागदपत्रावरून उघड झाले. हिराजी पाटील यांनी याबाबत २५ डिसेंबर रोजी उरण पोलिसांत तक्रार दाखल के ली.

च्त्या खरेदी खतामध्ये २००६ साली कुळकायदा परवानगी घेण्यासाठी तहसीलदार उरण यांच्याकडे नोंदविलेल्या कुळमुखत्यार पत्राची प्रत जोडली होती. या कुळ मुखत्यारपत्र लिहून देणाºया व्यक्तींपैकी निरा आत्माराम पाटील या २८ आॅक्टोबर २०१४ रोजी मयत झाल्या होत्या, तर संतोष आत्माराम पाटील हे ३१ आॅगस्ट २०१७ रोजी आणि विठाबाई तुळशीराम पाटील या १७ मार्च २०१७ रोजी मयत झाल्या होत्या. त्यामुळे मुखत्यारपत्र हे रद्द झाल्यात जमा होते.

च्हिराजी कृष्णा पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांना न विचारताच त्यांच्या मिळकतीवर कुळकायद्याचा शिक्का होता. तो काढण्यासाठी अशोक सत्यनारायण केजरीवाल यांनी उरण तहसीलदार यांच्याकडे परस्पर अर्ज दाखल करून सदरच्या ३१ ग ची परस्पर परवानगी तहसीलदारांकडून घेतली. सातबारावरील बोजा कमी करून उपनिबंधक उरण यांच्याकडे खरेदीखतही नोंदवून घेतल्याचे समोर आले आहे.

च्खरेदीखतासोबत अशोक केजरीवाल यांनी उरण तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर प्रतिज्ञापत्र करून कुळमुखत्यारपत्र लिहून देणाºया व्यक्तींपैकी कोणीही मयत नसल्याचे दाखवून उपनिबंधक उरण यांच्याकडे त्याच कागदपत्राच्या आधारे १५ जून २०१८ रोजी खरेदीखत केले. हिराजी कृष्णा पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांना व्यवहारात ठरलेली बाजार भावाप्रमाणे एक कोटी ८२ लाख रु पयांची रक्कम बुडवण्यात आली आहे, असे हिराजी पाटील यांचे वकील अ‍ॅड. राकेश पाटील यांनी सांगितले. खरेदीखताचा दस्त लिहून देणाºया व्यक्ती मयत असतानाही त्यांच्या नावाने खरेदीखत केले जाते, तसेच तहसीलदार उरण यांच्या कार्यालयात खोटे अर्ज करून कुळ कायद्याच्या परवानग्या देऊन सातबारा परस्पर बदलले जातात. त्यामुळे संबंधित अधिकाºयांवर तत्काळ गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी हिराजी पाटील यांनी केली.

च्शेतकºयांची फसवणूक करणाºया परप्रांतीय भूमाफियांना मदत करण्याचे काम येथील महसूल प्रशासन करत असल्याचे हिराजी पाटील यांच्या तक्रारीवरून आणि पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने समोर आले आहे, आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी सांगितले.
च्उरण पोलिसांनीही सामान्य शेतकºयांच्या मागे राहण्याची भूमिका घेतली, त्याबाबत त्यांचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांचे आवाहन
या आधीही माणगाव, रोहा, कर्जत तालुक्यांत बनावट कागदपत्रे सादर करून कोट्यवधी रुपयांची जमीन स्वस्तात लाटण्याचे प्रकार उघडकीस येऊन गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. बनावट व्यवहारापासून सावध राहावे, असे आवाहन वेळोवेळी रायगडचे पोलीस अधीक्षक डॉ. अनिल पारस्कर यांनी केले आहे.

Web Title: Sale of land by false documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.