उधाणाच्या तडाख्याने बांधबंदिस्ती फुटल्याने हजारो एकर शेतीत खारे पाणी, शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 05:17 PM2023-08-10T17:17:34+5:302023-08-10T17:18:19+5:30

उरण परिसरातील खारलँड विभागाने खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तींच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने भात शेतीचे  संरक्षण करणारी बांधबंदिस्ती उध्दवस्त होत आहेत.

Salt water in thousands of acres of agriculture due to the bursting of the embankment due to the eruption of sea water | उधाणाच्या तडाख्याने बांधबंदिस्ती फुटल्याने हजारो एकर शेतीत खारे पाणी, शेतकरी हवालदिल

उधाणाच्या तडाख्याने बांधबंदिस्ती फुटल्याने हजारो एकर शेतीत खारे पाणी, शेतकरी हवालदिल

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : उरण पुर्व विभागातील पिरकोन,आवरे, गोवठणे, बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी, सांगपाले ,काशी,पारंगी,रेवचावळा या  खाडीकिनाऱ्यावरील खार बांधबंदिस्ती समुद्रातील उधाणाच्या पाण्यात उध्दवस्त झाली आहेत.त्यामुळे समुद्रातील खारे पाणी शेत जमीनीत शिरल्याने लागवडी खाली असलेली भातशेती नष्ट होऊन हजारो एकर भात शेती नापीक  होण्याचा धोका निर्माण झाला आहे.या परिसरातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मात्र पुरता हवालदिल झाले आहेत.

उरण परिसरातील खारलँड विभागाने खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तींच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने भात शेतीचे  संरक्षण करणारी बांधबंदिस्ती उध्दवस्त होत आहेत. १९ जुलैच्या समुद्राच्या मोठ्या उधाणाच्या  खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने समुद्रातील खारे पाणी हे भात शेतीत शिरल्याने हजारो एकर भातशेती उध्दवस्त होऊन भातशेतीचा चिखल  झाला आहे. समुद्रातील खारे पाणी हे शेत जमीनीत शिरूर पिरकोण,आवरे, गोवठणे, बांधपाडा ( खोपटा ) ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी,सांग पाले खार,काशी,पारंगी,रेवचा वळा खार या परिसरातील हजारो एकर भात शेती नापीक होण्याच्या मार्गावर लागली आहे.

खारलँड विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर शेतीची पाहणी करून तातडीने खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावली नाहीतर समुद्राच्या उधाणाचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरेल अशी भीती पिरकोन येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील 
यांनी व्यक्त केली आहे.

उरण तालुक्यातील आवरे, गोवठणे , बांधपाडा , पिरकोण सारख्या इतर ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने समुद्राचे पाणी हे भात शेतीत शिरले आहे.त्या संदर्भात खारलँड विभागाकडून पाहणी करून तशा प्रकारचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती पेण खारलँड विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांनी दिली.

Web Title: Salt water in thousands of acres of agriculture due to the bursting of the embankment due to the eruption of sea water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :uran-acउरण