शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

सांबरकुंड धरण २०२२ पर्यंत पूर्ण होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:33 AM

जलसंपदा विभागाकडून पुन्हा हालचाली सुरू : ३६ वर्षे प्रकल्प रखडला; लवकरच त्रुटींची पूर्तता

- जयंत धुळप अलिबाग : तालुक्याचा कायापालट करू शकणाऱ्या, मात्र तरीही गेल्या ३६ वर्षांपासून रखडलेल्या सांबरकुंड धरणाच्या कामाला आता नव्याने चालना मिळणार आहे. केंद्रीय जल आयोगाची मान्यता, तांत्रिक समितीने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता, पर्यावरण खात्याची मान्यता वेळेत मिळाल्यास या प्रकल्पाचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होईल, असे लेखी उत्तर जलसंपदा विभागाने दिले आहे.प्रकल्पाचा मूळ अंदाजित खर्च ११.७१ कोटी रुपये होता, ३६ वर्षांच्या विलंबामुळे तो २०१२-१३ मध्ये ३३५.९२ कोटी रुपयांवर गेला आहे. प्रकल्पासाठी येणारा अंदाजित खर्च वाढणार असल्याने सुधारित पाचव्या प्रशासकीय अंदाजपत्रकास मान्यता मिळविण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे. मूळ प्रशासकीय मान्यता २८ सप्टेंबर १९८२ मध्ये ११.७१ कोटीची देण्यात आली होती. आता नव्याने प्रकल्पावर जलसंपदा विभाग काम करीत आहे. सर्व संबंधित परवानग्या आणि आवश्यक भूमिसंपादन नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होईल, असे लेखी उत्तर अलिबागचे आमदार पंडित पाटील यांना राज्याच्या जलसंपदा विभागाने दिले आहे.सांबरकुंड धरण प्रकल्पाचे लाभक्षेत्र २९२७ हेक्टर असल्याने प्रकल्पाने अलिबाग तालुका सुजलाम-सुफलाम होणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच बारमाही शेती, बागायती, लघुउद्योग यांच्यासाठी धरणातील पाण्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यांचे परिवर्तन घडू शकते, असा विश्वास पंडित पाटील यांनी व्यक्त केला आहे. नवीन भूसंपादन कायद्यानुसार, मोबदला देण्यात यावा ही प्रमुख मागणी येथील प्रकल्पग्रस्तांची आहे. धरण प्रकल्पासाठी २७५ हेक्टर जमीन लागणार असून या जमिनीच्या भूसंपादनाची किंमत चालू बाजारभावाप्रमाणे कोट्यवधीच्या घरात जाणार आहे.शेतकऱ्यांना ३३ कोटी रुपयांचे वाटपधरणाच्या बुडीत क्षेत्रासाठी खासगी जमिनीतील १०३.८१ हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनासाठी २०१३ मध्ये ४.१२ कोटी रुपये महसूल यंत्रणेस देण्यात आले आहेत. तर मार्च २०१६ मध्ये धरणास मान्यता दर्शविलेल्या प्रकल्पबाधित शेतकºयांना भूसंपादन कायदा २०१३ नुसार ३३ कोटी रु पयांचे वाटप करण्यात आले आहे.जांभूळवाडी, सांबरकुंडवाडी व खैरवाडी या तीन गावांचे पुनर्वसन रामराज येथील राजेवाडी येथे करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी आवश्यक २८ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव रायगड जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे. प्रकल्पबाधित गावांमधील २०८ एकूण कुटुंबांची पंचवीस वर्षांपूर्वी लोकसंख्या १०२७ होती, त्यामध्ये आता तिप्पट वाढ झाली आहे. परिणामी ३६ वर्षांपूर्वीच्या समस्यांमध्ये आता वाढ झाली असून या सर्व समस्यांतून मार्ग काढून हे धरण बांधण्याचे मोठे आव्हान जलसंपदा विभागापुढे आहे.प्रशासकीय मान्यता व आर्थिक बाजूमूळ मान्यता११.७१ कोटीदुसरी सुधारित मान्यता२९.७१ कोटीतिसरी सुधारित मान्यता५0.४0 कोटीचौथे प्रस्तावित दरपत्रक३३५.९२ कोटीसांबरकुंड धरण-आवश्यक जमीनबुडीत क्षेत्र२२८.४० हेक्टरकालव्यासाठी जमीन४६.६० हेक्टरसिंचनाचे लाभक्षेत्र२९२७ हेक्टरमोबदला वाटप३३ कोटी रु पये

टॅग्स :Raigadरायगड