संभाजी देशमुख यांची समाधी होणार संरक्षित स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 05:00 AM2018-10-06T05:00:38+5:302018-10-06T05:01:13+5:30
सुधागड मराठ्यांच्या ताब्यात घेण्याचा पराक्रम : जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरातत्व विभागाने सविस्तर माहिती मागविली
जयंत धुळप
अलिबाग : संभाजी राजांच्या निधनानंतर राजाराम महाराजांच्या काळात, रायगड जिल्ह्यातील सुधागड किल्ल्यावरील मोगलांचे साम्राज्य गनिमीकाव्याने उलथवून टाकून, सुधागड मराठ्यांच्या ताब्यात घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पराक्र मी संभाजी हैबतराव देशमुख यांची सुधागड तालुक्यातील तिवरे गावातील समाधी, राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याकरिता आवश्यक प्रस्ताव सादर करण्याकरिता विविध नऊ मुद्द्यांवर राज्याच्या पुरातत्व विभागाचे रत्नागिरी येथील सहायक संचालक भा. वि. कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून माहिती मागविली आहे.
समाधीच्या अस्तित्वाबाबत ७८ ऐतिहासिक दस्तपुरावे सुधागड तालुक्यातील तिवरे गावांत आडबाजूला अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत असलेली पराक्रमी संभाजी देशमुख यांची ही समाधी तब्बल तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ऐतिहासिक दस्तावेज व ग्रंथाच्या अभ्यासांती शोधून काढण्यात इतिहास संशोधक परब यांना यश आले. समाधीबाबत अधिकृत पुरावे त्यांनी सादर करून ती समाधी पराक्र मी संभाजी हैबतराव देशमुख यांची असल्याचे सिद्ध केले.
च्महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाने इतिहास संशोधक परब यांचे संशोधनास प्रसिद्ध केले होते.
पहिला उल्लेख भोर संस्थानच्या इतिहासात
च्संभाजी हैबतराव देशमुख यांनी किल्ले सुधागड हस्तगत करण्यासाठी केलेल्या पराक्र मां संदर्भातील पहिला उल्लेख अनंत नारायण भागवत यांनी लिहिलेल्या ‘भोर संस्थानचा इतिहास’ या ग्रंथात आढळतो. त्यामध्ये, ‘सुधागड किल्ला चढून एकदम हल्ला करण्यास मार्ग नाही, असे पाहून त्यांच्या धारकºयांनी तो युक्तीनेच छापा घालून घेण्याची खटपट केली आणि ती शेवटासही गेली. तेव्हा संभाजी हैबतराव, राघोजी गौळी, रत्नोजी हुले, हिरोजी जाधव, जावजी चव्हाण, गंगाजी शिंदे वगैरे मुख्य धारकरी असून, त्या सर्वांचा आणि सरदार मालोजी भोसले यांचा समावेश होता,’ अशी नोंद आहे.
च्पराक्र मी संभाजी देशमुख यांची तिवरे गावातील समाधी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित होणार असल्याची माहिती अथक परिश्रमांती ही समाधी शोधून काढणारे परळी (पाली) येथील इतिहास अभ्यासक व संशोधक संदीप मु. परब यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
पंतसचिव शंकराजी नारायण यांचे इनामपत्र
च्या कालखंडासंदर्भात ग्रंथकार अनंत भागवत यांनी कोणत्याही तारखेचा उल्लेख केलेला नसला, तरी तो सुधागड या किल्ल्याशी निगडित आहे. मात्र, संभाजी देशमुख यांना मिळालेल्या इनामपत्राच्या संदर्भातील नोंदीत उल्लेख आहे.
संभाजी देशमुख समाधी
च्सुधागड तालुक्यात मौजे तिवरे, येथे सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांची समाधी आहे. समाधीची एक बाजू मोडकळीस आली असून, समाधीचा इतर भाग सुस्थितीत आहे. समाधीच्या चारही बाजूस दहा इंचात कोरीव नक्षीकाम केलेले आहे. समाधीच्या मुख्य चौथºयाच्या मध्यभागी चौकोनात समाधी लेख कोरलेला आहे. या लेखात,‘संभाजीराव निरंतर बहिरजीराव शके. १७.२२’ असे नमूद करण्यात आले आहे.
समाधी लेखाची चिकित्सा
च्डॉ. मो. गं. दीक्षित यांनी ‘मराठेशाहीतील शिलालेख’ या आपल्या ग्रंथात महाराष्ट्रातील शके १४९७ पासून शके १८०० पर्यंतचे सुमारे १५२ शिलालेख संग्रहित करून, ते लेख कोरण्याकरिता वापरण्यात येणारा दगड, लेखाची जागा, लेख कोरण्याची पद्धत, लेखाची भाषा व लिपी, लेखाचे लिखाण, लेखाचा मायना, लेखाचा कालखंड व व्यक्तिनाम या विविध अंगाने विस्तृत असे विवेचन केलेले आहे. सरदार संभाजी हैबतराव यांच्या समाधीवरील लेखाचे निरीक्षण केले असता, ही समाधी संभाजी हैबतराव देशमुख यांचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.