गिरीश गोरेगावकर माणगाव : सावित्री नदीकिनारी सापे, टोळ, कोकरे दाभोळ व म्हाप्रल परिसरांत अवैध उत्खनन सक्शन पंपाद्वारे होत आहे. आजही महाड, माणगाव तालुक्यातील सावित्री नदीकाठी हजारो ब्रास रेतीचे साठे दिसून येतात. सापे, टोळ, टोळ खुर्द, कोकरे, काफिला बंदर, जांभली तसेच मुंबई-गोवा महामार्गालगत वीर गाव व वीर रेल्वे स्टेशन परिसरात हजारो ब्रास अवैधरीत्या साठवलेले आहेत, त्यातूनच या वाळूची अवैध वाहतूक होत आहे. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या सर्वांकडे जिल्ह्यातील महसूल, पोलीस अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.चार महिन्यांपूर्वीच अंबेत-गोरेगाव रस्ता हा नवीन करण्यात आला; परंतु आज या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे येथून होणाºया ओव्हरलोड वाहतुकीचा अंदाज येतो. सावित्री नदीच्या खाडीला लागून असणारा हा रस्ता टोळ, नांदवी व आंबेत, गोरेगाववरून येणाºया ओव्हरलोड गाड्यांमुळे नांदवी व पुरार येथील रस्त्यास चार महिन्यांतच खड्डे पडले आहेत. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच अशा अवजड वाहनांमध्ये प्रेशर हॉर्न लावल्याने हॉर्नच्या आवाजाचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. नांदवी व पुरार या गावांतील नागरिक इतके त्रस्त झाले आहेत की, ते रोड रोको आंदोलनाच्या पावित्र्यातआहेत.खनिजकर्म विभाग, महसूल प्रशासन, पोलीस आणि परिवहन यांच्या दुर्लक्षामुळे वाळू व्यवसाय हा तेजीत चालू आहे. यामुळेचे येथील रस्त्यांची वाताहत झाली आहे. कोट्यवधी रु पयांची उलाढाल होणाºया या अवैध धंद्यांवर जिल्हाधिकाºयांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत. पर्यावरणाची इतकी मोठी हानी होत असल्याने पर्यावरणप्रेमी नाराज आहेत.कारवाई बोथटसावित्री नदीपात्रात अवैध वाळूवर महसूल कारवाई करून, अनेक वाहने, बोटी व रेती जप्त होते. जप्त रेतीपैकी कैक ब्रास रेती ही परस्पर विकली जाते. अधिकाºयांचे याकडे सर्रास दुर्लक्ष होते. गेली कित्येक वर्षे ही कारवाई होते. मात्र, केलेला दंडवसुली तर दूरच पुन्हा त्याच परवानाधारकाला नवीन परवाना दिला जातो.एकावरही गुन्हा नाहीशासनाने अवैध रेती उत्खनन करणाºयांवर एमपीडीए व मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात उघडपणे अवैध प्रकार समोर दिसताना, तसेच अधिकाºयांवर हल्ले होत असताना, एकावरही असा गुन्हा दाखल नाही.अवैध अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. येथील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. याचा त्रास वाहनचालकां तर होतच आहे. मात्र येथून ये-जा करणाºया पादचाºयांसाठी त्रासदायक झाले आहे.>आंबेत-गोरेगाव रस्ता हा मे महिन्यात नवीन झाला असून, वाळूची होणारी अवैध ओव्हरलोड वाहतूक यामुळे हा रस्ता खराब झाला. या ठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच प्रेशर हॉर्न यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास यामुळे आम्ही वनी, पुरार व नांदवी गावांतील नागरिक रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. वेळ पडली तर उपोषणही करू.- डॉ. मुस्सदिक कादरी, सरपंच, पुरारवाळूची ओव्हर लोड वाहतूक होतांना माझ्या निदर्शनास आल्यास मी तत्काळ कारवाई करेल, तसे आदेश मी आमच्या वाहतूक पोलीस कर्मचाºयांना दिले आहेत.- राजेंद्रकुमार परदेशी, पोलीस निरीक्षक,माणगाव पोलीस ठाणेसेक्शन पंपाने वाळू काढली जाते परंतु ती महाड तालुक्यातील भाग येतो. जर वाळूची वाहतूक रॉयिल्ट पावती न घेता किंवा ओव्हर लोड वाहतूक होत असेल तर मी करवाई नक्की करेल, तसेच आरटीओ विभागास ओवरलोड वाहतूक करीत असलेल्या वाहनाविरु ध्द करवाई करण्यास सांगू.- उर्मिला पाटील,तहसीलदार, माणगाव
वाळूच्या ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांची दुर्दशा, खड्ड्यांमुळे स्थानिकांसह वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 3:14 AM